सुंदर दिसण्यासाठी काय करते प्राजक्ता माळी, म्हणाली- "मी नॉनव्हेज खात नाही आणि रात्री ८ नंतर..."

By कोमल खांबे | Updated: February 26, 2025 16:03 IST2025-02-26T15:38:25+5:302025-02-26T16:03:08+5:30

प्राजक्ता माळीच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. प्राजक्ता तिच्या सौंदर्याने चाहते घायाळ होतात.

प्राजक्ता माळीच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. प्राजक्ता तिच्या सौंदर्याने चाहते घायाळ होतात.

नुकतंच प्राजक्ताने जयंती वाघधरेच्या आम्ही असं ऐकलंय या मुलाखतीत तिचं ब्युटी सिक्रेट सांगितलं.

प्राजक्ता म्हणली, "स्किनचे ७ लेयर असतात. त्यामुळे तुम्ही वरून चेहऱ्यावर ज्या क्रीम लावता त्या फार फार तर ४ लेयरपर्यंत जातात. त्यामुळे तुम्ही उत्तम आहार घेणंही महत्त्वाचं आहे".

"मी सोडा, कोल्ड ड्रिंक्स, मैद्याचे पदार्थ फार कमी खाते. जेवढं आपण खातो तेवढी आपली हालचालही व्हायला लागते".

"मी सकाळी रोज उठून एक चमचा तूप खाते आणि पाणी पिते. मी व्हेजिटेरियन झाली आहे. हळूहळू मी व्हिगन व्हायचा प्रयत्न करतेय".

"मी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी केले आहेत. आपल्या प्रदेशात जे पिकतं आपण तेच खाल्लं पाहिजे. गहू आपल्याकडे पिकत नाही त्यामुळे आपण भाकरी खाल्ली पाहिजे".

"ताक, कोशिंबीर आपल्या आहारात असलं पाहिजे. रात्री ८ नंतर मी जेवत नाही. रात्री भूक लागली तर मग मी ड्रायफ्रूट्स किंवा राजगिराचा लाडू खाते".

" मी रोज योगा आणि प्राणायम करते. सकाळी मी चेहऱ्यावर टोनर लावते".

"आणि मेकअप करणार असेल तर आधी प्रायमर लावते. रात्री झोपताना क्रीम किंवा नाईट ऑईल लावून झोपते".