'पहिली शेर,दुसरी सव्वाशेर...', सिनेमातील अशोक सराफांची 'ही' नायिका आठवते? आता फारच बदलली, 'या' मालिकेत करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:59 IST2026-01-02T16:31:24+5:302026-01-02T16:59:20+5:30
अअशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री आठवते? आता फारच बदलली, 'या'लोकप्रिय मालिकेत करतेय काम

विनोदाचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ यांचे चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने बघतात.

पद्मश्री-महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.

त्यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यातीलच एक नाव म्हणजे 'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'. २००६ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला.

या चित्रपटात सारिका नवाथेने पांडबाची दुसरी बायको म्हणजेच मालकीणची भूमिका साकारली होती. त्यावेळी तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं होतं.

चित्रपटात गावाकडची पण तितकीच हुशार दिसणारी पांडबाची मालकीण आता फारच बदलली आहे.

सारिका नवाथे सोशल मीडियावर तिचे फोटो,व्हिडीओ शेअर करत असते. आता अभिनेत्री आता फारच बदलली असून खूप सुंदर दिसते.

सध्या सारिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय 'कमळी' या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती नयनतारा नावाचं पात्र साकारते आहे.

















