बाबो! लंडनहून येतात निक्की तांबोळीचे मेकअप प्रोडक्ट्स; एका सीरमचीच किंमत..; बॉयफ्रेंडने सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:30 IST2026-02-19T18:09:38+5:302026-02-19T18:30:20+5:30
निक्की तांबोळीबद्दल हे माहितीये का?

'बिग बॉस मराठी ५'मध्ये दिसलेली निक्की तांबोळी सध्या 'द ५०'शोमध्ये सहभागी झाली आहे. यामध्ये बिग बॉसमध्येच दिसलेला तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलही आहे.

द ५० शोमध्ये स्पर्धकांना अनेक टास्क दिले गेले. एकमेकांविरोधात त्यांना खेळावं लागलं. अशाच एका डेअर ऑर नो डेअर चॅलेंजमध्ये निक्की तांबोळीला कठीण निर्णय घ्यावा लागला.

निक्कीला टास्कमध्ये घरातील सदस्यांचं सामान चोरी करायचं होतं. मात्र स्पर्धकांनी आरडाओरडा केल्यावर तिने स्वत:चेच मेकअप प्रोडकट्स 'लायन'ला दिले. यानंतर मनी पॉटमध्ये १ लाख जमा झाले. मात्र निक्कीला रडू कोसळलं.

निक्की एवढी का रडतेय याचं कारण अरबाजने सांगितलं. तो म्हणाला, "निक्की लंडनहून मेकअप प्रोडक्ट्स मागवते. तिचं सीरम ५० हजारांचं आहे. मॉश्चरायझर ७५ हजारांचं आहे. एवढ्या पैशात तुम्ही कितीतरी वर्षांची इतर खरेदी कराल."

"निक्की स्वत:च्या पैशांनी हे प्रोडक्ट्स घेते. यावरुन ती किती कमावते याचाही अंदाज येतो. निक्कीने याआधी अनेकदा बोटॉक्स आणि फिलर्सही केलं आहे. तसंच बिग बॉसमध्ये जाण्याआधी तिने नाकाची सर्जरी केली होती."

निक्कीविषयी बोलताना अरबाज असंही म्हणाला की, "बिग बॉस मराठीचा जो विजेता ठरला होता त्याचा नंतर सिनेमाही आला. त्याच्या प्रीमिअरला निक्की जाऊ शकली नव्हती म्हणून तिने नंतर अख्खं थिएटर बुक केलं होतं.

"अरबाज स्पर्धकांना म्हणाला की, ती तुमच्या सामानाला काहीही होऊ देणार नाही. ती स्वत:चं सगळं सामान त्याग करेल पण तुमचं सामान सुरक्षित ठेवेल."

















