या प्रसिद्ध क्रिकेटरसोबत रिलेशनमध्ये आहे अंडरवर्ल्ड डॉनची प्रेयसी, डॉनमुळेच जावं लागलं होतं तुरूंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 11:32 IST2022-07-01T11:21:36+5:302022-07-01T11:32:41+5:30
Monica Bedi : अभिनेत्री त्यांच्या करिअर दरम्यान अभिनेत्यांच्या प्रेमात पडलेल्या दिसतात तर काही अभिनेत्री क्रिकेटर्सच्या किंवा बिझनेसमनच्या प्रेमात पडतात. मोनिका बेदीचंही तेच आहे.

Monica Bedi Relationship: मोनिका बेदीचं नाव तिच्या सौंदर्यासोबत अंडरवर्ल्डसोबत तिच्या रिलेशनमुळेही चांगलंच गाजलं. बऱ्याच अडचणींचा सामना करत अभिनेत्री मोनिका आता शांतपणे आपलं जीवन जगत आहे. रूपेरी पडद्यापासून दूर असलेल्या मोनिकाने अजूनपर्यंत लग्न केलं नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून मोनिकाची लव्ह लाइफ पुन्हा चर्चेत आली आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्यात सर्वांनाच इंटरेस्ट असतो. अभिनेत्री त्यांच्या करिअर दरम्यान अभिनेत्यांच्या प्रेमात पडलेल्या दिसतात तर काही अभिनेत्री क्रिकेटर्सच्या किंवा बिझनेसमनच्या प्रेमात पडतात. मोनिका बेदीचंही तेच आहे.
मोनिका बेदी आधीपासून तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत होती. करिअरच्या सुरूवातीला मोनिका अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या प्रेमात पडली होती. ती सगळं काही सोडून त्याच्याकडे गेली आणि त्यामुळेच तिला तुरूंगात जावं लागलं.
मोनिका बेदी आणि अबू सालेमची लव्हस्टोरी चांगलीच फेमस आहे. आपलं करिअर सोडून ती अबू सालेमच्या प्रेमात हरवली. याच कारणाने नंतर तिला तुरूंगात जावं लागलं. मोनिका आता पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे.
काही महिन्यांपूर्वी मोनिका बेदी माजी क्रिकेटर अझरूद्दीनच्या मुलाच्या लग्नात पोहोचली होती. मोनिका बेदी आणि अझरूद्दीन यांच्यात वाढत असलेली जवळीक सध्या चर्चेचा विषय आहे. पण दोघांनी यावर अजून काही प्रतिक्रिया दिली नाही.
रिपोर्ट्सनुसार, अजहर आणि मोनिका बराच वेळ सोबत घालवत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अझरूद्दीन आणि मोनिका यांची भेट त्यांच्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती.
अझरूद्दीन आणि नौरीन यांचा मुलगा असुद्दीनच्या लग्नात मोनिका बेदी अजहरची स्पेशल गेस्ट बनून गेली होती. मोनिका आणि अजहरचे यावेळचे फोटोही व्हायरल झाले होते.
तुरूंगात बाहेर आल्यावर ती पडद्यावरही दिसली होती आणि आता ती एक लक्झरी लाइफ जगत आहे. मोनिका तिच्या करिअर दरम्यान सिनेमा आणि तिच्या भूमिकांपेक्षा जास्त तिच्य पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहत होती.
मोनिकाने सांगितलं की, अबूसोबत तिची ओळख दुबईमध्ये एका शो दरम्यान झाली होती. तिला नव्हतं माहीत की, तो अंडरवर्ल्ड डॉन आहे. अबू सालेमने असाही दावा केला होता की, त्याने मोनिकासोबत लग्न केलं आहे. पण मोनिकाने हे नाकारलं होतं.
मोनिकाला खोट्या पासपोर्ट प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झाली होती. 2007 मध्ये ती बाहेर आली तेव्हा तिला कॅमेरात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सची मोठी गर्दी झाली होती.
मोनिका बेदी आता 47 वर्षांची आहे आणि अजूनही सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे. ती सोशल मीडिया अॅक्टिव असते. फॅन्ससाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.