'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील साध्या भोळ्या नम्रताचं लयभारी फोटोशूट; साडीत खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:57 IST2025-06-12T17:48:08+5:302025-06-12T17:57:14+5:30

अभिनेत्री मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मधुराने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत तिने साकारलेलं इमली नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

सध्या मधुरा स्टार प्रवाह वाहनीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत 'नम्रता देसाई' ही भूमिका साकारत आहे.

दरम्यान, मालिकेत साधी भोळी दिसणारी ईश्वरीची बहिण नम्रता खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते.

नुकतेच मुधराने सोशल मीडियावर तिचे पारंपरिक अंदाजातील खास फोटो शेअर केले आहेत.

"करवली Mode On...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

या फोंटोमध्ये मधुरा जोशी अतिशय सुंदर दिसते आहे. तिचा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.