'लखलखत्या तेजाची, झगझगत्या रूपाची...' 'शुभविवाह' फेम कुंजिका काळवींटने शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:11 IST2024-10-14T15:54:33+5:302024-10-14T16:11:22+5:30
'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिका काळवींट सध्या चर्चेत आली आहे.

कुंजिकाने छोट्या पडद्यावर विविध धाटणीच्या भूमिका साकारून चाहत्यांचं प्रेम मिळवलं आहे.
कुंजिका सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
त्याद्वारे वेगवेगळे फोटो, व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते.
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळतो आहे.
जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून आलंय.
शिवाय केसातील गजरा, कानातील झुमक्यांनी कुंजिकाच्या सौंदर्यात भर घातली आहे.
'ती परत आलीय', 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतही अभिनेत्रीने काम केलं आहे.
अभिनेत्रीने एका कपड्यांच्या ब्रॅंडसाठी हे फोटोशूट केलं आहे.