'सावळ्याची जणू सावली' फेम प्राप्ती रेडकरचं मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट, कॅप्शनने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:46 IST2025-01-13T16:28:03+5:302025-01-13T16:46:04+5:30
अभिनेत्री प्राप्ती रेडकरचं मकर संक्रांत स्पेशल खास फोटोशूट, काळ्या पैठणी साडीत खुललं सौंदर्य.

झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत 'सावली'ची भूमिका साकारुन अभिनेत्री प्राप्ती रेडकर घराघरात पोहोचली.
या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली आहे.
'सावळ्याची जणू सावली' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्राप्ती रेडकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
या माध्यमातून आपले नवनवीन फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
काळ्या रंगाची पैठणी साडी नेसून त्यावर मराठमोळा साज करून अभिनेत्रीने हा लूक केला आहे.
'Culture' असं कॅप्शन देत प्राप्तीने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत.