PHOTO: "बार बार देखो...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकरचा रेट्रो लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:59 IST2024-12-28T15:49:16+5:302024-12-28T15:59:54+5:30

ज्ञानदा रामतीर्थकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

परंतु 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली अपूर्वा नावाची व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

ज्ञानदाची सोशल मीडियावर तगडी फॅनफॉलोइंग आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

ज्ञानदाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे रेट्रो लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आता होउदे धिंगाणा' या कार्यक्रमासाठी तिने हा लूक केला आहे.

या कार्यक्रमाच्या शंभराव्या एपिसोडनिमित्त अभिनेत्रीने रेट्रो लूक करून हजेरी लावली.

"रेट्रो स्टाईल धिंगाणा..., शंभरी पार!" असं कॅप्शन ज्ञानदाने या फोटोंना दिलं आहे.