"GF बनशील की नाही?", मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला अभिनेता, होकार देताच थेट साखरपुडाच केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:27 IST2026-02-23T15:22:48+5:302026-02-23T15:27:53+5:30

छोट्या पडद्यावरील टीव्ही अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे. मी संसार माझा रेखिते फेम शुभम मुरुडकर याने सृष्टी जाधव हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.

मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. रेवती लेले, एतशा-निषाद यांच्यानंतर आणखी एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

छोट्या पडद्यावरील टीव्ही अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे. मी संसार माझा रेखिते फेम शुभम मुरुडकर याने सृष्टी जाधव हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.

सृष्टी हीदेखील कलाविश्वात सक्रिय आहे. ती एक मेकअप आर्टिस्ट आहे. एका मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली होती.

शुभम आणि सृष्टीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भाग्य दिले तू मला या मालिकेच्या दरम्यान शुभम आणि सृष्टीची पहिली भेट झाली होती. या मालिकेच्या कास्टिंगची जबाबदारी शुभमकडे होती.

मालिकेत एक मेहेंदी आर्टिस्ट हवी होती. कुणीतरी शुभमला सृष्टीचं नाव सुचवलं होतं. त्यानंतर शुभम आणि सृष्टी यांची चांगली मैत्री झाली.

या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. शुभमने सृष्टीला प्रपोज करत थेट विचारलं होतं की "GF बनशील की नाही, की थेट लग्न करशील?".

त्यानंतर सृष्टीने होकार दिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.