कोण आहे राधा पाटील? जाणून घ्या मिलिंद गुणाजींच्या सुनेविषयी काही खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 11:05 AM2021-12-19T11:05:22+5:302021-12-19T11:15:29+5:30

Radha patil: अभिषेकने त्याची प्रेयसी राधा पाटील हिच्याशी मोठ्या थाटात लग्न केलं. तेव्हापासून गुणाजी कुटुंबाच्या या नव्या सुनेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारं स्टार कपल म्हणजे अभिनेता मिलिंद गुणाजी. (Milind Gunaji) आणि राणी गुणाजी (Rani Gunaji).

कलाविश्वातील या लोकप्रिय जोडीने अलिकडेच एका नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे. ही जोडी आता सासू-सासरे झाले असून त्यांच्या लेकाचं अभिषेक गुणाजीचं (Abhishek Gunaji) नुकतंच लग्न झालं आहे.

अभिषेकने त्याची प्रेयसी राधा पाटील हिच्याशी मोठ्या थाटात लग्न केलं. तेव्हापासून गुणाजी कुटुंबाच्या या नव्या सुनेविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

अभिषेक आय.टी. अभियंता असून त्याची पावलंदेखील आपल्या आई-वडिलांप्रमाणे कलाविश्वाकडे ओढली आहेत. अभिषेक सध्या चित्रपट निर्माता म्हणून काम करत आहे.

अभिषेकची पत्नी राधा ही कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

राधा मुंबईत फार्मा क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे तिचा कलाविश्वाशी फारसा संबंध येत नाही.

अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे.