PHOTOS : चर्चा आहे ती ‘तिची’! ‘ती परत आलीये’मधील या अभिनेत्रीच्या फोटोंवर व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:18 IST2021-08-12T15:08:30+5:302021-08-12T15:18:09+5:30

Ti Parat Aaliye: होय, चर्चा आहे ती ‘तिची’. झी मराठीवर लवकरच ‘ती परत आलीये’ ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे आणि आता या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या नावाचा खुलासाही झालाये.

होय, चर्चा आहे ती ‘तिची’. झी मराठीवर लवकरच ‘ती परत आलीये’ ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे आणि आता या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या नावाचा खुलासाही झालाये.

या मालिकेत अभिनेत्री कुंजिका काळविंट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कुंजिका छोट्या पडद्यावरचा एक लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

याआधी अनेक मालिकांमध्ये कुंजिका दिसली आहे. छोट्या पडद्यावरच्या ‘स्वामिनी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

या मालिकेत कुंजिकाने आनंदीबाईंची भूमिका साकारून तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली होती.

‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत तिने प्रियाची भूमिका साकारली होती.

छोट्या पडद्याशिवाय मोठ्या पडद्यावरही कुंजिका झकळली होती. ‘एक निर्णय’ या चित्रपटात तिने काम केले होते.

कुंजिका आता झी मराठी वरील ‘ती परत आलीये’ मालिकेत मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

‘ती परत आलीये’ ज्येष्ठ अभिनेते विजय कदम हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद असल्याचे कुंजिकाने म्हटलेय.

कुंजिकासोबत अभिनेता श्रेयस राजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत श्रेयसने राजकुमारची भूमिका साकारली होती.