कार्तिक आर्यन vs रणबीर, प्रभास vs थलपति विजय; यावर्षी 'हे' दिग्गज अभिनेते बॉक्स ऑफिसवर भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:09 IST2026-01-01T17:06:26+5:302026-01-01T17:09:48+5:30

२०२५ ला निरोप देत सर्वांनीच नववर्षाचं जंगी स्वागत केलं. यावर्षी म्हणजेच २०२६ साली बॉलिवूड आणि साउथमध्ये अनेक सिनेमांची मेजवानी असणार आहे. यामध्ये अनेक कलाकार एकमेकांशी बॉक्स ऑफिसवर भिडतील अशीही शक्यता आहे. काही बिग बजेट सिनेमांच्या रिलीज डेट एकच आल्याने त्यांच्यात क्लॅश होणार आहे.

'जना नायकन' आणि 'द राजा साहब': जानेवारी महिन्यातच पहिला क्लॅश होणार आहे. तमिळ भाषेतील 'जना नायकन' आणि तेलुगु मधील 'द राजा साहब' दोन्ही सिनेमे ९ जानेवारी रोजी रिलीज होणार आहेत. 'जना नायकन'मध्ये थलपति विजय मुख्य भूमिकेत आहे तर 'द राजा साहब' प्रभासचा सिनेमा आहे. दरम्यान थलपति विजय आता राजकारणात गेल्याने त्याचा हा शेवटचा सिनेमा आहे. त्यामुळे त्याचा अगणित चाहतावर्ग बघता प्रभासच्या सिनेमाला फटका बसण्याची शक्यता आहे.

'हॅपी पटेल: खतरनाक जासूस' आणि 'मायासभा': १६ जानेवारी रोजी हे तीन सिनेमे रिलीज होत आहेत. हॅपी पटेल हा सिनेमा आमिर खानने निर्मित केला आहे. यातून इमरान खान कमबॅक करत आहे. कॉमेडियन वीर दासचा हा पहिलाच सिनेमा आहे. तो यात मुख्य भूमिकेत आहे. तर दुसरीकडे 'तुंबाड' फेम राही बर्वेचा 'मायासभा' हा सायकॉलॉडिकल थ्रिलर सिनेमा याच दिवशी येत आहे.

File informationOperations 2026/01/1616184/movie-1.jpg English Title (Optional) Please enter only English title Marathi Title (Optional) Please enter only Marathi title Description (*) 'जना नायकन' आणि 'द राजा साहब': जानेवारी महिन्यातच पहिला क्लॅश होणार आहे. तमिळ भाषेतील 'जना नायकन' आणि तेलुगु मधील 'द राजा साहब' दोन्ही सिनेमे ९ जानेवारी रोजी रिलीज होणार आहेत. 'जना नायकन'मध्ये थलपति विजय मुख्य भूमिकेत आहे तर 'द राजा साहब' प्रभासचा सिनेमा आहे. दरम्यान थलपति विजय आता राजकारणात गेल्याने त्याचा हा शेवटचा सिनेमा आहे. त्यामुळे त्याचा अगणित चाहतावर्ग बघता प्रभासच्या सिनेमाला फटका बसण्याची शक्यता आहे. Description of the Image 2026/01/1616186/movie-2.jpg English Title (Optional) Please enter only English title Marathi Title (Optional) Please enter only Marathi title Description (*) 'हॅपी पटेल: खतरनाक जासूस' आणि 'मायासभा': १६ जानेवारी रोजी हे तीन सिनेमे रिलीज होत आहेत. हॅपी पटेल हा सिनेमा आमिर खानने निर्मित केला आहे. यातून इमरान खान कमबॅक करत आहे. कॉमेडियन वीर दासचा हा पहिलाच सिनेमा आहे. तो यात मुख्य भूमिकेत आहे. तर दुसरीकडे 'तुंबाड' फेम राही बर्वेचा 'मायासभा' हा सायकॉलॉडिकल थ्रिलर सिनेमा याच दिवशी येत आहे. Description of the Image

'धुरंधर २', 'टॉक्झिक' आणि 'डकैत': 'धुरंधर' सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतच आहे. त्याच्या दुसऱ्या पार्टची सर्वांना उत्सुकता आहे. १९ मार्च रोजी 'धुरंधर' येत आहे. दरम्यान त्याच दिवशी साउथ स्टार यशच्या 'टॉक्झिक' ही रिलीज होत आहे. तसंच मृणाल ठाकुर, अनुराग कश्यपचा 'डकैत'ही याच दिवशी येणार आहे.

'भूत बंगला' आणि 'आवारापन २': अक्षय कुमारचा आगामी 'भूत बंगला' २ एप्रिलला येणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी इमरान हाश्मीचा 'आवारापन २' ३ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे अक्षय कु्मार आणि इमरान हाश्मी यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

'नागजिला' आणि 'लव्ह अँड वॉर': २०२६ च्या मध्यात १४ ऑगस्ट रोजी कार्तिक आर्यन आणि रणबीर कपूर भिडण्याची शक्यता आहे. कार्तिकचा 'नागजिला' त्या दिवशी येणार आहे. तर रणबीर कपूरचा 'लव्ह अँड वॉर'चीही हीच तारीख निश्चित करण्यात आली आहे.