Jiya Shankar : "मी दोन मुलं दत्तक घेईन, मम्मीसोबत आरामात राहतील"; जिया शंकरने सांगितला लग्नाचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:13 IST2025-01-09T15:07:10+5:302025-01-09T15:13:41+5:30
Jiya Shankar : अभिनेत्री जिया शंकरने पिंकविलाला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये रिलेशनशिपबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.

अभिनेत्री जिया शंकरने पिंकविलाला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये रिलेशनशिपबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने मोठा खुलासा केला आहे.
"मला नेहमीच फॅमिली हवी होती आणि मला जॉईंट फॅमिली जास्त आवडते" असं सांगितलं. तसेच लग्नाबद्दलही माहिती दिली.
"जास्तीत जास्त येत्या दोन वर्षांत लग्न करायचं आहे. जर कोणी भेटलं नाही तर मी मम्मीला सांगेन की, अरेंज मॅरेजची वेळ आता आली आहे."
"मी अशी मुलगी आहे, जिला लग्न करायचं आहे. फॅमिली हवी आहे. मी दोन मुलं दत्तक घेईन. मी, माझी आई, दोन श्वान, एक मांजर आणि दोन मुलं अगदी आरामात राहू" असं म्हटलं.
जिया शंकरने आपलं अफेअर आणि ब्रेकअपबाबतही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, तिला त्याचा अजिबात पश्चाताप होत नाही.
"मी एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये होती. ज्यामुळे मी खूप कोलमडून गेली होती. मी स्वत:ला हरवून बसले होते."
जियाच्या अभिनयाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ती बिग ब़ॉस ओटीटी सीझन २ मध्ये देखील दिसली होती.
जिया सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.