Ayaz Khan : बिपाशा बासू- करण सिंग ग्रोव्हरनंतर अयाज खान झाला बाबा, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:24 IST2022-12-22T17:53:42+5:302022-12-22T18:24:31+5:30

अयाज खानची पत्नी जन्नतने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

'दिल मिल गए' या टीव्ही शोमधून लोकप्रिय झालेल्या अयाज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगामन झालं आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

अयाज खानची पत्नी जन्नतने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

आपल्या मुलीची पहिली झलक अयाज खाननं सोशल मीडियावर शेअर केली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

पोस्टमध्ये मुलीचा फोटो शेअर करताना अयाजने सांगितले की, 21 डिसेंबरला त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. (फोटो- इंस्टाग्राम)

अयाज खानच्या लग्नाला जवळपास पाच वर्षे झाली आहेत, 30 सप्टेंबर रोजी अयाजने पत्नी जन्नतसोबतचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, ते लवकरच आई-बाबा होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

अयाज खान सध्या पडद्यापासून दूर आहे, पण त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)