IN PICS : अचानक कुठे गायब झाल्या रातोरात चर्चेत आलेल्या इंडस्ट्रीतील 'या' आयटम गर्ल्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:00 IST2022-02-19T08:00:00+5:302022-02-19T08:00:07+5:30
Bollywood : बॉलिवूडमध्ये आयटम सॉन्गचा ट्रेंड आला आणि इंडस्ट्रीतल्या अनेक आयटम गर्लचे चेहरेही चाहत्यांना पाठ झालेत. आयटम सॉन्गमुळे अनेकजणी रातोरात प्रसिद्ध झाल्या. पण यापैकी बऱ्याच जणींनी आज इंडस्ट्रीला रामराठ ठोकला आहे.

बॉलिवूडमध्ये आयटम सॉन्गचा ट्रेंड आला आणि इंडस्ट्रीतल्या अनेक आयटम गर्लचे चेहरेही चाहत्यांना पाठ झालेत. आयटम सॉन्गमुळे अनेकजणी रातोरात प्रसिद्ध झाल्या. पण यापैकी बºयाच जणींनी आज इंडस्ट्रीला रामराठ ठोकला आहे.
निगार खान ही नॉर्वेची लोकप्रिय मॉडेल. चढती जवानीच्या रिमिक्समध्ये ती झळकली होती. हे गाणं चांगलंच गाजलं होतं. 2015 मध्ये ‘दो चेहरे’ या चित्रपटात ती अखेरची दिसली आणि यानंतर अचानक इंडस्ट्रीमधून बाद झाली.
या यादीत नताशा स्टँकोव्हिच हिचंही नाव येतं. नताशा ही एक सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे. डीजे वाले बाबू या गाण्याने नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह या सिनेमात अइयो जी या आयटम सॉन्गवर ती थिरकताना दिसली. ही नताशा आता क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत सुखाने संसार करतेय.
क्लाऊडिया ही अक्षय कुमारसोबत ‘खिलाड़ी 786’ या चित्रपटातील बलमा या गाण्यात दिसली होती. या गाण्याने धूम केली होती. पण आज ही क्लाऊडिया इंडस्ट्रीतून पुरती गायब झाली आहे.
मेघना नायडूला ‘कलियों के चमन’ या आयटम सॉन्गमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. रिलीज होताच या गाण्यात धुमाकूळ घातला होता. ही मेघना आज चित्रपटांपासून दूर तिच्या पर्सनल लाईफमध्ये बिझी आहे.
2015 साली ऐश्वर्या रायच्या ‘जज्बा’ या सिनेमात आज रात का सीन बना ले या आयटम नंबरवर थिरकणारी दिक्षा कौशल ही सुद्धा इंडस्ट्रीमधून गायब आहे. या गाण्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती.
बाबूजी जरा धीरे चलो... या सुपरहिट आयटम सॉन्गमधील याना गुप्ता या गाण्यानंतर एका रात्रीत स्टार झाली होती. पण आज इंडस्ट्रीत ती कुठेही नाही.