'या' बॉलिवूड अभिनेत्रींच्या गॅरेजमध्ये उभ्या आहेत या लक्झरी कार्स, किंमत वाचाल तर व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 17:33 IST2021-12-24T17:19:21+5:302021-12-24T17:33:13+5:30

Bollywood Actress's Cars : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे १ किंवा २ नाही तर त्यापेक्षा जास्त महागड्या गाड्यांचे मालक आहेत. बॉलिवूडच्या अभिनेत्रीही यात मागे नाहीत. अनेक अभिनेत्रींकडे महागड्या गाड्या आहेत.

बॉलिवूडमध्ये लक्झरी कार्सचे शौकीन कमी नाहीत. मग ते हिरो असो वा हिरोईन. ते लक्झरी कार्समध्ये फिरताना नेहमीच दिसतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे १ किंवा २ नाही तर त्यापेक्षा जास्त महागड्या गाड्यांचे मालक आहेत. बॉलिवूडच्या अभिनेत्रीही यात मागे नाहीत. अनेक अभिनेत्रींकडे महागड्या गाड्या आहेत.

कतरिना कैफ - कतरिना कैफ कधीही दोन गोष्टीसोबत कॉम्प्रमाइज करत नाही. एक स्टाइल आणि दुसरी म्हणजे स्टॅंडर्ड. कॅटकडे एक पांढऱ्या रंगाची 'Land Rover Range Rover Vogue आहे. या कारची किंमत २.१० कोटी ते ४.३८ कोटी रूपयांदरम्यान आहे.

अनुष्का शर्मा - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही महागड्या गाड्यांची शौकीन आहे. ती 'Bentley Continental GT' कार ची मालक आहे. ही कार ३.८ कोटी रूपयांच्या प्राइस टॅगसोबत येते.

प्रियांका चोप्रा - बॉलीवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा जेव्हा मुंबईत असते तेव्हा ती तिच्या फेवरेट 'Rolls Royace Ghost' कारमधून प्रवास करताना दिसते. या कारची किंमत ५ कोटी रूपये आहे. यासोबत प्रियांकाकडे 'BMW' आणि 'Mercedes Maybach' कारही आहेत.

दीपिका पादुकोन - दीपिका पती रणवीरसारखीच महागड्या कारमध्ये प्रवास करते. ती तिच्या Maybach मध्ये दिसते. या कारची किंमत १.८६ कोटी रूपये आहे. त्याशिवाय तिच्याकडे Audi Q8 जी १.५८ कोटी रूपये आणि Q7 जी ८० लाखांची कार आहे.

करिना कपूर - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी कार्स आहेत. ती सामान्यपणे Mercedes-Benz S-Class कारने फिरताना दिसते. या लक्झरी कारची किंमत १.३३ कोटी रूपये इतकी आहे.

आलिया भट्ट - आलियाला सुद्धा महागड्या गाड्यांची आवड आहे. तिच्याकडे आता १ कोटी रूपयांची Jaguar XJL, २ कोटी रूपयांची Mercedes S Class कार आहेत. सोबतच तिच्याकडे 'BMW' कारही आहे.

सोनम कपूर Mercedes-Benz S-Class कारची मालक आहे. ही कार तिला तिचे वडील अनिल कपूर यांनी गिफ्ट केली होती. या कारची किंमत १.२८ कोटी रूपये आहे.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी Maserati Ghibli कारची मालक आहे. ही एक 'Nerissimo' स्पेशल एडीशन कार आहे. या कारची भारतातील किंमत १.४० कोटी रूपये आहे.

कियारा अडवाणीने नुकतीच तिच्यासाठी नवीन कार खरेदी केली. तिने 'Audi A8' घेतली. या कारची किंमत १.५६ कोटी रूपये आहे.

क्रिती सेननही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रितीने नुकतीच स्वत:ला २.६३ कोटी रूपयांची 'Maybach' ही कार गिफ्ट केली.