माधुरी-करिश्माला द्यायची टक्कर! भारतीय टीमच्या कॅप्टनसोबत रंगलेल्या अफेअर्सच्या चर्चा, अभिनयानंतर राजकारणाकडे वळली पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:28 IST2025-12-26T18:19:40+5:302025-12-26T18:28:01+5:30
वयाच्या ५१ व्या वर्षीही सिंगल आहे 'ही'नायिका, सौंदर्याचे सिनेचाहते होते दिवाने

नगमा त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. माधुरी-करिश्माला द्यायची टक्कर देणाऱ्या या नायिकेने सिनेसृष्टीला रामराम करत राजकारणात पाऊल ठेवले. ही अभिनेत्री नगमा आजही चाहत्यांच्या चर्चेत असते.

नगमा त्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. माधुरी-करिश्माला द्यायची टक्कर देणाऱ्या या नायिकेने अचानक सिनेसृष्टीला रामराम करत राजकारणात पाऊल ठेवले. ही अभिनेत्री नगमा आजही चाहत्यांच्या चर्चेत असते.

१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागीः अ रिबेल फॉर लव्ह' या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.त्यावेळी तिचं वय फक्त १६ वर्ष होतं.

या चित्रपटामुळे नगमा रातोरात स्टार बनली. नगमाची सलमान खानसोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. नगमाने आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांना भूरळ घातली होती.

नगमाने आपल्या कारकीर्दीत ‘बेवफा से वफा’, ‘दिलवाले कभी ना हारे’, ‘किंग अंकल’, ‘हस्ती’, ‘धरतीपुत्र’, ‘सुहाग’, ‘कौन रोकेगा मुझे’, ‘लाल बादशाह’, ‘कुंवारा’, पुलिस और मुजरिम, यल्गार, सुहाग आणि ‘चल मेरे भाई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान केवळ बॉलिवूड नव्हे, तर साऊथ मनोरंजन विश्वात देखील नगमाच्या अभिनयाचा जलवा दिसला.

आपल्या चित्रपटांसह नगमा तिच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळेही तितकीच चर्चेत राहिली. क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबतही नगमाचे नाव जोडले गेले होते. दोघांची पहिली भेट १९९९ मध्ये वर्ल्ड कप दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघं अनेक वेळा एकत्र दिसले.

सौरव क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता, त्यामुळे दोघे एकमेकांपासून दूर झाले असं सांगण्यात येतं. यानंतर नगमाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि राजकारणात प्रवेश केला. आजही वयाच्या ५१ वर्षी ही नायिका सिंगल आहे.

















