डेब्यू सिनेमातून स्टार झाली! तिला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची रांग लागायची; पण एका रात्रीने सगळंच बदललं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:33 IST2026-01-13T17:22:41+5:302026-01-13T17:33:27+5:30
डेब्यू सिनेमातून गाजवलं बॉलिवूड! 'या' सौंदर्यवतीला चित्रपटात घेण्यासाठी निर्माते पैशांच्या बॅगा घेऊन घराबाहेर उभे राहायचे, पण...

चित्रपटसृष्टीत आपल्या छोट्या कारकिर्दीतही प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अनु अग्रवाल.

१९९० साली आलेल्या आशिकी या चित्रपटातून अनु अग्रवाल रातोरात स्टार झाली.अतिशय साधी असलेल्या अनुने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर अभिनेत्रीची गाडी सुस्साट निघाली.

करिअरमधील पहिलाच सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अनु अग्रवाल यांच्या लोकप्रियतेचा आलेख इतका उंचावला होता की, चित्रपटसृष्टीतील मोठे निर्माते तिला सिनेमात घेण्यासाठी घराबाहेर तासन् तास थांबायचे.

एकापाठोपाठ एक चित्रपट आणि करिअर यशाच्या शिखरावर असताना एका अपघाताने तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं.

अनु तब्बल २९ दिवस कोमात होती. अभिनेत्रीची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती, अगदी स्वत:लाही ओळखू शकत नव्हती.शरीराला अर्धांगवायूचा झटका बसला होता आणि चेहराही विद्रूप झाला होता.

हा अपघात इतका भयानक होता की त्यातून सावरायला अनुला तब्बल चार वर्षे लागली. स्मृती परत येईपर्यंत तिची फिल्मी कारकीर्द जवळपास संपली होती.

मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या अनु यांनी स्वतःला सावरण्यासाठी बॉलिवूडचा झगमगाट सोडून दिला. त्यांनी योगाभ्यास आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

दरम्यान अनु अग्रवालच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर 'आशिकी' सिनेमानंतर तिने 'गजब तमाशा', 'किंग अंकल', 'राम शास्त्र' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

















