'नैना दा कहना, असी तेरा मुखडा देखते रहना...' बॉलिवूडच्या बिल्लो राणीचं देखणं रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:45 IST2024-04-27T16:39:24+5:302024-04-27T16:45:34+5:30
बॉलिवूडची हॉरर क्वीन म्हणून अभिनेत्री बिपाशा बासूला ओळखलं जातं.

'राझ' या चित्रपटात तिने साकारलेली संजनाची भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
'राझ- ३', 'क्रिचर -३ डी' तसेच 'अ लोन' यांसारख्या चित्रपटांमध्ये हॉरर सिन्स साकारत अभिनेत्रीने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हिंदी, तेलुगू, तमिळ तसेच अनेक बंगाली चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत बिपाशाने तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केलाय.
२००१ मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
'जिस्म','राझ', 'अजनबी' आणि 'धूम' यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.
सध्या अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून लांब आहे. बिपाशा तिच्या कौंटुबिक जीवनात व्यस्त आहे. अलिकडेच अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
नुकतेच बिपाशा बासूने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वेगवेगळ्या पोज देत तिने हे खास फोटोज काढलेत.
गडद गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान करून तिने फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.