"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:50 IST2025-06-18T15:36:14+5:302025-06-18T15:50:22+5:30
Palak Purswani : पलक पुरसवानीने मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्टचा स्कॅम उघड केला आहे.

बिग बॉस ओटीटी २ फेम पलक पुरसवानीने मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्टचा स्कॅम उघड केला आहे. पलकने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आता वेळ आलीय... असं म्हणत मोठी पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये पलक पुरसवानीने दोन अकाउंट शेअर केले आहेत. त्यापैकी एक अकाउंट टिया नावाचं आहे आणि दुसरं प्रज्ञा नावाचा आहे. तिने दोघीही स्कॅमर असल्याचं म्हटलं आहे.
पलकने लिहिलं की, इंडस्ट्रीमध्ये एक मुलगी आहे जी स्वतःला स्टायलिस्ट म्हणवून लोकांना फसवत आहे. तिने आतापर्यंत पलकच्या ओळखीच्या अनेक कलाकारांना फसवलं आहे.
यामध्ये टीव्ही अभिनेत्री सिमरन बुधरुपचाही समावेश आहे. ही मुलगी स्टायलिंग असाइनमेंटबद्दल लोकांशी बोलते आणि त्यांच्याकडून अॅडव्हान्स घेते आणि नंतर कपडे येत नाहीत किंवा ती गायब होते.
सिमरन व्यतिरिक्त पलक पुरसवानीला ओळखणाऱ्या इतर अनेक कलाकारांसोबत ही धक्कादायक घटना घडली आहे.
अशा परिस्थितीत अभिनेत्रीने सर्वांना सावधगिरी बाळगण्याचा आणि काहीही बुक करण्यापूर्वी चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे.
पलकची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. युजर्सनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्ट ट्रोल होत आहेत.
पलकने 'बडे भैया की दुल्हनिया', 'मेरी हनीकारक बीवी', 'ये रिश्ते हैं प्यार के', 'दुर्गा: माता की छाया' आणि 'दबंगी' यासारख्या शोमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.