आधी स्क्रिप्टच दिली नाही! 'छावा'बाबत आस्ताद काळेचा गौप्यस्फोट, म्हणाला- "सेटवर कळलं मला फक्त दीडच वाक्य..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:16 IST2025-04-26T16:13:22+5:302025-04-26T16:16:21+5:30

विकी कौशलच्या छावामध्ये अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. अभिनेता आस्ताद काळे सिनेमात दिसला. पण, आता मात्र त्याने छावाबाबत अनेक खुलासे केले आहेत.

विकी कौशलच्या छावामध्ये अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. अभिनेता आस्ताद काळे सिनेमात दिसला. पण, आता मात्र त्याने छावाबाबत अनेक खुलासे केले आहेत.

आस्तादने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "मला संपूर्ण स्क्रिप्ट दिलेलं नव्हतं. मला कास्टिंगसाठी फोन येत होते".

"एकतर माझं हो नाही, हो नाही चाललेलं. मी त्यांना म्हटलेलं की मला नुसतं उभं करू नका. कारण, ते एकतर काल्पनिक पात्र आहे. सूर्याजी निकम असं पात्र होऊन गेलेलं नाही. त्याची नोंद तरी नाही".

"मी त्यांना म्हटलं की मला एक सीन दिलात तरी चालेल. पण, त्यात अभिनेता म्हणून मला काहीतरी करता येईल, असं द्या".

"त्या भूमिकेसाठी थिएटर केलेलेच मराठी कलाकार हवेत असं सांगितलं गेलं होतं. जो सीन आहे तो एकदा वाचायला पाठवाल का? असं मी त्यांना विचारलं होतं".

"त्यावर त्यांनी मला असं आम्ही देऊ शकत नाही, असं म्हटलं. ठीक आहे, स्क्रिप्ट बाहेर जायला नको म्हणून त्यांनी केलं असेल. ते मला मान्य आहे".

"सेटवर गेलो, रेडी होऊन सीन वाचला तेव्हा लक्षात आलं की फक्त दीडच वाक्य आहे. रेडी झाल्यानंतर हे असं असेल तर मी करणार नाही. अशी माझी शिकवण नाही. हे संस्कार आमच्यावर नाहीत. त्यामुळे मी केलं".