अमिताभ बच्चन अन् शाहरुख खान वयाच्या कितव्या वर्षी बनले 'डॉन'?, आता रणवीर सिंहही सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:00 IST2025-12-04T15:43:28+5:302025-12-04T16:00:26+5:30
किती होतं पहिल्या दोन्ही 'डॉन'चं वय? आता रणवीर सिंह वयाच्या ४१ वर्षी बनणार 'डॉन'

डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है! 'डॉन' सिनेमातला हा डायलॉग गेल्या कित्येक वर्षांपासून आजही सर्वांच्या ओठांवर आहे.

आधी अमिताभ बच्चन यांनीच या डायलॉगमधून स्वत:ची वेगळी ओळख मिळवली. १९७८ साली आलेल्या 'डॉन' सिनेमात त्यांनी विजयची भूमिका साकारली जो नंतर डॉन होतो. सिनेमाने ७ कोटी कमावले होते.

काही वर्षांनी २००६ मध्ये फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीने 'डॉन'चा रिमेक आणला. यामध्ये शाहरुख खान 'डॉन'होता. किंग खानलाही या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. सिनेमाने ५० कोटी कमावले.

नंतर २०११ साली 'डॉन २' बनवण्यात आला. यात काही नवीन कलाकारही घेण्यात आले. या सिनेमालाही तुफान यश मिळालं. सिनेमाने २०० कोटींची कमाई केली होती.

तर आता बीटाऊनमध्ये नवीन 'डॉन' येत आहे. रणवीर सिंह 'डॉन ३'मध्ये भूमिका साकारणार आहे. फरहान अख्तरने शाहरुखनंतर आता रणवीरला संधी दिली आहे.

दरम्यान या अभिनेत्यांनी वयाच्या कितव्या वर्षी 'डॉन'ची भूमिका साकारली माहितीये का? 'डॉन'वेळी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानचं वय किती होतं वाचा

१९७८ साली 'डॉन' आला तेव्हा अमिताभ बच्चन ३५ वर्षांचे होते. तर २००६ साली आलेल्या 'डॉन' वेळी शाहरुख खान ४१ वर्षांचा होता. तर 'डॉन २'वेळी शाहरुख ४६ वर्षांचा होता.

आता रणवीर सिंह लवकरच 'डॉन ३'चं शूट सुरु करणार आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी रणवीर 'डॉन'बनणार आहे. आता रणवीरला प्रेक्षकांचं तेवढंच प्रेम मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

















