मराठी मालिकेतल्या घरंदाज सुनेच्या ‘बोल्ड & हॉट’ लूकची चर्चा… पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 00:49 IST2024-07-10T00:39:23+5:302024-07-10T00:49:46+5:30
Akshaya Hindalkar Bold Photos, Punha Kartavya Aahe: 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत ती वसुंधरा या अतिशय सोज्वळ सुनेची भूमिका साकारत आहे.

Akshaya Hindalkar Punha Kartavya Aahe Marathi:
'पुन्हा कर्तव्य आहे' ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे. अलिकडेच सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर मुख्य भूमिका साकारत आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत ती वसुंधराच्या भूमिकेत आहे.
मुख्य भूमिका साकारणारी वसुंधरा म्हणजेच अभिनेत्री अक्षया हिंदाळकर मालिकेत जरी घरंदाज, सोज्वळ अशा भूमिकेत असली तरी सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसची चर्चा आहे.
अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते.
अक्षयाने आपल्या काही जुन्या फोटोंमधील बोल्डनेस पुन्हा एकदा नव्याने दाखवून दिला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
'चंद्र जेव्हा अर्धा होतो, त्यावेळी देखील त्याला चंद्रच म्हणतात' अशा आशयाच्या कॅप्शनसह अक्षयाने ही पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्ट अल्पावधीतच खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.