Sonarika Bhadoria : "त्याने माझा पाठलाग केला, २५ नंबरवरुन मला कॉल केले, घाणेरडे मेसेज पाठवले, धमकी दिली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:52 IST2025-02-27T13:44:23+5:302025-02-27T13:52:51+5:30
Sonarika Bhadoria : सोनारिकाने सांगितलं की, एक माणूस तिचा गेल्या कित्येक महिन्यांपासून पाठलाग करत होता.

अभिनेत्री सोनारिका भदौरियाने 'देवों के देव... महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका साकारली आहे. आता तिने एक धक्कादायक खुलासा केला.
सोनारिकाने सांगितलं की, "एक माणूस तिचा गेल्या कित्येक महिन्यांपासून पाठलाग करत होता. त्याने घाणेरडे मेसेज पाठवले. यानंतर तिने तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे."
"तो साठ-आठ महिन्यांपासून मला वारंवार मेसेज आणि फोन करत होतो. मी त्याचे सततचे मेसेज पाहून वैतागली आणि घाबरली होती."
"जेव्हा मी त्याचा नंबर ब्लॉक केला तेव्हा त्याने माझ्याची कॉन्टॅक्ट करण्यासाठी दुसऱ्या नंबर्सचा वापर केला. त्याने २५ नंबरवरून मला कॉन्टॅक्ट केला, कॉल केले."
"काही दिवसांसाठी मी माझा फोन बंद केला. तेव्हा त्याने माझे वडील आणि नातेवाईकांना कॉल करण्यास सुरुवात केली."
"सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली."
"तरुणाने पोलिसांना सांगितलं की, त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. पण मी लग्नास नकार दिल्यानंतर तो आत्महत्येची धमकी देऊ लागला."
"एका सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याने माझा नंबर मिळवला होता" असं सोनारिकाने म्हटलं आहे. २०१७ मध्ये ही घटना घडली होती.
सोनारिका भदौरियाने २०२४ मध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे.