शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

त्याची वाट पाहतेय... कुवेतमध्ये आईला मेसेज, डायरीत बॉयफ्रेंडची आठवण; प्रसिद्ध युट्युबरने संपवलं जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:07 IST

1 / 8
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमची रहिवासी आणि प्रसिद्ध युट्युबर बोनू कोमली हिने सोमवारी तिच्या भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या आईला पाठवलेला शेवटचा मेसेज आणि तिच्या डायरीतील मजकूर वाचून पोलिसांसह सर्वच हळहळत आहेत.
2 / 8
कोमलीची आई बी. सत्य वरलक्ष्मी या कुवेतमध्ये घरकाम करतात. सोमवारी पहाटे १:३४ वाजता कोमलीने तिच्या आईला एक मेसेज पाठवला. त्यात तिने लिहिले होते, 'मम्मी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. स्वतःची काळजी घे आणि लहान भावाला नीट सांभाळ.'
3 / 8
हा मेसेज पाहताच घाबरलेल्या आईने कुवेतमधून तिला सतत फोन केले, पण कोमलीचा फोन बंद होता. शेवटी आईने हैदराबादमधील एका मित्राला घरी पाठवले, तेव्हा कोमली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
4 / 8
कोमली गेल्या ११ महिन्यांपासून हैदराबादमधील मणिकोंडा भागात एकटी राहत होती आणि बीएससीचे शिक्षण घेत होती. पोलिसांनी घटनास्थळावरून तिची डायरी जप्त केली आहे. त्यात तिने तिच्या प्रियकराबद्दलच्या भावना लिहिल्या होत्या.
5 / 8
'मला पुढे जाण्याची भीती वाटतेय, कारण जर तो परत आला तर? मला माहीत आहे की मी त्याला सोडून द्यायला हवे, तो आता माझा नाहीये, तो थांबण्याचा प्रयत्नही करत नाहीये. पण माझ्या मनाचा एक कोपरा अजूनही त्याची वाट पाहत आहे. मला अशी आशा वाटते की, तो एक दिवस पुन्हा माझी निवड करेल,' असं त्यात लिहिलं होतं.
6 / 8
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कोमलीचे एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि युट्युबरसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळापूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. या विरहामुळे कोमली प्रचंड मानसिक तणावाखाली होती. यापूर्वी सहा महिन्यांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
7 / 8
कोमलीने तिच्या युट्युब चॅनेलवर लाइफस्टाइल आणि डेली व्लॉग्सच्या माध्यमातून मोठी ओळख निर्माण केली होती. तिने नुकताच तिरुपती पदयात्रेचा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो प्रचंड व्हायरल झाला होता. आपली एक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने ही पदयात्रा केली होती, मात्र तोच तिचा शेवटचा व्हिडिओ ठरेल, असे कोमलीच्या चाहत्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.
8 / 8
पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. आम्ही डिजिटल पुरावे, फोन रेकॉर्ड्स आणि मेसेजेस गोळा करत आहोत. प्रेमप्रकरणातील वादामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले.