Shocking! फ्रीजरमध्ये नग्नावस्थेत आढळला तरूणीचा मृतदेह, स्क्रू ड्रायव्हरने केले गेले ५० वार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 01:24 PM2021-08-13T13:24:12+5:302021-08-13T13:30:46+5:30

शेजाऱ्यांनी सांगितलं की हे कपल नेहमीच भांडण करताना दिसत होतं आणि तरूणीच्या बॉयफ्रेन्डचं वागणं चागलं नव्हतं. तपास अधिकारी अजूनही घटनास्थळाचं विश्लेषण करत आहेत.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, तरूणीच्या नव्या बॉयफ्रेन्डचं नाव जोसु आहे. ज्याचा शोध घेतला जात आहे आणि केसचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची काही चौकशी करायची आहे.

शेजाऱ्यांनी सांगितलं की हे कपल नेहमीच भांडण करताना दिसत होतं आणि तरूणीच्या बॉयफ्रेन्डचं वागणं चागलं नव्हतं. तपास अधिकारी अजूनही घटनास्थळाचं विश्लेषण करत आहेत.

एन गॅब्रिएलाचा एक्स-बॉयफ्रेन्डच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. ज्याला तरूणीच्या चार वर्षाच्या मुलाचा पिता मानलं जात आहे. एक्स-बॉयफ्रेन्डने सांगितलं की, तो काही दिवसांपासून एनाचा शोध घेत होता.

तो म्हणाला की, 'बऱ्याच दिवसांपासून जेव्हा एनाचा काहीच पत्ता लागला नाही तेव्हा मी यात लक्ष घातलं आणि तिच्या घरात काही पुरावा मिळतो का हे बघण्यासाठी तिच्या घरी गेलो.

जेव्हा तिच्या घरी मी गेलो तेव्हा फार दुर्गंधी येत होती. त्यानंतर मी फ्रिज आणि फ्रीजर उघडून पाहिलं. तेव्हा मला धक्कादायक नजारा दिसला.

एना गॅब्रिएलाचा मृतदेह तिच्या एक्स बॉयफ्रेन्डने सर्वातआधी पाहिला आणि पोलिसाला याची माहिती दिली. त्याने सांगितलं की, त्याला फ्रीजरमध्ये तिचं नग्न शरीर दिसलं.

फ्रीजरच्या आत तिचं नग्न शरीर आढळून आलं. तर तिच्या शरीरावर ५० वेळा पेचकसने वार केले होते. तरूणीचं शरीर एका भ्रूणाप्रमाणे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. तिचे हात बांधलेले होते आणि तिचं डोकं पायांच्या मधे होते.

अधिकाऱ्यांना दिसलं की, तिच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. ज्याबाबत त्यांचं मत होतं की, हे वार पेचकसने केले आहेत.

मिररच्या रिपोर्टनुसार, पाच महिन्यांआधी बेपत्ता १९ वर्षीय एना गॅब्रिएला मदीना ब्लॅकोचा मृतदेह २९ जुलैला व्हेनेजुएलाच्या अरागुआ राज्यातील तिच्या घरात आढळून आला.

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, तिला अखेरचं फेब्रुवारी महिन्यात बघण्यात आलं होतं. एना नेहमीच व्हेनेजुएलाची राजधानी काराकासला जात होती. त्यामुळे ती गायब होण्याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. एना गॅब्रिएलाच्या सावत्र वडिलांनी मीडियाला सांगितलं की ती देशाच्या एका वेगळ्या भागात राहत होती आणि क्वचितच त्यांचं बोलणं होत होतं.

Read in English