Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:36 IST2025-06-16T16:26:20+5:302025-06-16T16:36:20+5:30

Sonam Raghuwanshi photos: सोनम रघुवंशी हे नाव देशाच्या गल्लीबोळात पोहोचलंय. हनिमूनचा प्लॅन केला आणि तिकडेच प्रियकर व त्याच्या मित्रांच्या मदतीने हत्या केली, असा आरोप तिच्यावर आहे.

मेघालयातील हनिमूनला नेऊन करण्यात आलेल्या हत्येचा प्रकरणात सोनम रघुवंशी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सोनम रघुवंशीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे.

सोनम रघुवंशीचे या प्रकरणापासून काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटोही समोर आलेत.

सोनम रघुवंशीचे कॉर्पोरेट ते पारंपरिक लुकमधील फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.

राजा रघुवंशीसोबत सोनमचे लग्न झाले होते. मात्र, त्यापूर्वीच सोनमचे राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती या हत्येनंतर समोर आली.

सोनम रघुवंशी लग्नासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी करतानाचेही काही फोटो आहेत. शॉपिंगवेळी सोनम काही फोटो काढले आहेत.

११ फेब्रुवारी रोजी सोनम आणि राजा रघुवंशीचा साखरपुडा झाला होता. त्याचेही फोटोही आहेत. सोनमचा राजासोबत लग्न करण्यास नकार होता, तरीही तिचे लग्न लावून देण्यात आले.

सोनम लग्नापूर्वीच्या काही फोटोंमध्ये खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. काही फोटो कॉर्पोरेट लूकमधीलही आहेत.

सोनम रघुवंशी घरच्याच प्लायवूड व्यवसायामध्ये मॅनेजरच्या भूमिकेत सगळे काम बघायची. त्यावेळचा तिचा प्रोफेशनल लूकमधील काही फोटोही आहेत.

२३ जून रोजी राजा आणि सोनम बेपत्ता झाले होते. त्यांची स्कूटर बेवारस स्थितीत आढळली होती. नंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला होता.

राजाची हत्या करून सोनम फरार झाली होती. त्यानंतर ती इंदूरमध्ये येऊन राहिली. पोलिसांनी मदत करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये गेली आणि अपहरण झाले होते, असा बनाव केला.