बहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाने लांबवले तिचे १२ लाखांचे दागिने अन् पैसे; भाचीकडून तक्रार

Published: May 14, 2021 01:25 PM2021-05-14T13:25:54+5:302021-05-14T13:51:36+5:30

भाचीने मामाकडे हात जोडून विनंती केली की, पैसे तुम्ही घ्या. पण आईचे दागिने परत द्या. कारण ते आमच्या आईची निशाणी आहेत. पण मामाने काही ऐकलं नाही.

यूपीच्या कानपूरमधून भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेचं कोरोनामुळे निधन झालं आणि आरोप आहे की, तिच्या भावाने तिचे १२ लाख रूपये किंमतीचे दागिने आणि काही रक्कम लंपास केली. हॉस्पिटलमद्ये दाखल होण्यापूर्वी महिलेने हे दागिने आणि पैसे आपल्या भावाकडे दिले होते.

असे सांगितले जात आहे की कोरोनामुळे ज्या महिलेचं निधन झालं. ती मुंबईहून कानपूरला काही कामानिमित्त गेली होती. मृत महिलेच्या मुलांनी आपल्या मामा विरोधात कल्याणपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. महिलेचा मुलगा म्हणाला की, जोपर्यंत त्याच्या मामाला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत ते तिथून जाणार नाही.

यावर आरिकाने मामाकडे हात जोडून विनंती केली की, पैसे तुम्ही घ्या. पण दागिने परत द्या. कारण ते आमच्या आईची निशाणी आहेत. पण मामाने काही ऐकलं नाही.

त्यानंतर त्यांनी आपल्या मामाकडे दागिन्यांनी आणि आईच्या पैशांची मागणी केली तर मामाने काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांनी मामा विरोधात पोलिसात तक्रार दिली. मुलगी म्हणाली की ज्या मामाने आम्हाला खेळवलं त्याच्याच विरोधात तक्रार करणं फार वाईट वाटत आहे.

कानपूरच्या एका हॉटेलमध्ये ठिय्या मांडून बसलेल्या भाचीने मामाला शिक्षा देण्याचा निश्चय केलाय. भाची म्हणाली की, तिने कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, आपल्या मामाचं असं रूप बघायला मिळेल. मुंबईच्या मीरारोड येथे राहणाऱ्या मृतक महिलेच्या मुलीने सांगितले की कानपूरच्या कल्याणपूरमध्ये तिचं आजोळ आहे.

मृत महिलेच्या मुलीने सांगितले की, तिची आई २५ एप्रिलला मुंबईहून भाऊ अजयकडे गेली होती. इथे तिला कोरोनाची लागण झाली. तिला उर्सला जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी भावाने तिचे सर्व दागिने आणि पैसे जवळ ठेवून घेतले.

आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची माहिती मिळताच घरातील लोक लगेच फ्लाइटने कानपूरला पोहोचले. ती एका हॉटेलमध्ये थांबली. पण ५ मे रोजी आईचं निधन झालं. इथूनच मामाची नजर आईच्या दागिन्यांवर आणि पैशांवर आली.

आईवर अंत्यसंस्कार केल्यावर जेव्हा आरिकाने आपल्या मामाकडे दागिने आणि पैसे मागितले तर मामाने भाचीला धमकी देत काहीच देणार नसल्याचं सांगितलं.

यावर आरिकाने मामाकडे हात जोडून विनंती केली की, पैसे तुम्ही घ्या. पण दागिने परत द्या. कारण ते आमच्या आईची निशाणी आहेत. पण मामाने काही ऐकलं नाही.

असे सांगितले जात आहे की, मृत महिलेकडे २ लाख रूपये कॅश आणि १२ लाख रूपयांचे दागिने होते. हे दागिने महिलेने घातलेले होते. भाचीने मामा आणि त्याच्या परिवाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांनी दावा केला की लवकरच हे प्रकरण सोडवलं जाईल.