सोडणार नाय तुला!... म्हणत तरुणीने तरुणाला चप्पलेने हाणले; व्हिडीओ झाला व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:32 PM2021-05-26T17:32:34+5:302021-05-26T17:50:13+5:30

Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील गाझीपूर येथील गावात एका पंचायतीदरम्यान एका मुलीने एका युवकाला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की, गावात एक पंचायत चालू आहे, ज्यात बरेच लोक सामील आहेत. एक तरुण उभा आहे आणि त्याला मारहाण केली जात आहे. (All Photo - AajTak)

पंचायतीत उभे असलेला तरुणही हात जोडून माफी मागतो. ज्याने मारहाण केली तो आरोपीला सांगत आहे की, त्याने त्याची समाजात खूप अपमान केला आहे.

यानंतर, पंचायतीच्या निर्णयानुसार या युवकाला एका युवतीने शूजने मारहाण केली. ज्या मुलीने तरूणाला मारहाण केली आहे ती मुलगी म्हणते की, त्याने आपल्या बहिणीला मारले आहे, आता ती त्याला सोडणार नाही.

या मारहाणीमुळे बरेच लोक जमले आहेत आणि मुलीला अधिक त्या युवकाला अधिक मारहाण करण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पंचायतीमध्ये सामील झालेल्या लोकांवरही गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिस आता पंचायतीत सामील असलेल्या लोकांची ओळख पटवत आहेत आणि त्यांना अटक करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

या घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. धरमवीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, गाझीपूर गावात कश्यप समाजातील लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

त्यानंतर आयपीसीच्या कलम 306,141,143,503,506  नुसार किरतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली आहे. या सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल.