Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:07 IST2025-06-12T13:44:35+5:302025-06-12T14:07:46+5:30
Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्याकांडात पत्नी सोनमच्या भूमिकेबद्दल नवीन खुलासे होत आहेत. सोनमने राजसोबत मिळून हत्येचा कट रचला.

Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. राजा याची पत्नी सोनम हिनेच हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केला आहे.
Raja Raghuvanshi Case: सोनमने राजाच्या मृत्यूला आत्महत्या किंवा आत्महत्या दाखवायचे होते. पण हत्येच्या एका तासानंतर तिने केलेल्या एका चुकीमुळे प्रकरण उघडकीस आले.
Raja Raghuvanshi Case: राजाच्या मृत्यूच्या एका तासानंतर, सोनमने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
Raja Raghuvanshi Case: तिने हत्येला अपघात किंवा आत्महत्या असे दाखवण्यासाठी पोस्ट केली. नंतर त्याचा फोन मृतदेहासह एका दरीत फेकून दिला.
मेघालयचे पोलिस महासंचालक आय नोंगरांग यांनी एक मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, सोनमने सोहरा होमस्टेमध्ये सोडलेल्या सुटकेसमधून पोलिसांनी मंगळसूत्र आणि अंगठी जप्त केली, त्यावेळी या प्रकरणाचा उलघडा झाला.
सोनम रुममध्येच दागिने सोडून गेली होती, यामुळेच पोलिसांना तिच्यावर संशय आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे २२ मे रोजी सोहरा होमस्टे येथे पूर्व बुकिंग न करता पोहोचले. त्यांनी त्यांचे सामान होमस्टे येथेच सोडले आणि नोंगरियाट गावी जाण्यासाठी पायी निघाले.
मेघालय पोलिसांच्या एसआयटीने सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि सर्व प्रकारचे पुरावे सादर केले. तसेच, राज आणि सोनमला समोरा समोर बसवल्यानंतर सोनमला हत्या केल्याचे कबुल केले.
पोलिसांनी सांगितले की, "आज संशयितांना न्यायालयात पाठवण्यासाठी कागदपत्रे तयार केली जात आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांची चौकशी करण्यासाठी वेळ मिळाला नाही.