Raj Kundra : क्राईम ब्रँचच्या हाती लागले Raj Kundraच्या घरचे सर्व्हर; एक्स पीएने बनवलेले ७० पॉर्न व्हिडीओ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:45 PM2021-07-22T13:45:39+5:302021-07-22T14:05:03+5:30

Raj Kundra :पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा राईट हॅन्ड असलेला मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. असे म्हटले जाते की आरोपी उमेश कामत याने बनविलेले ७० व्हिडिओ गुन्हे शाखेने जप्त केले आहेत.

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना घराचे सर्व्हरही मिळाले आहे.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश कामत याने हे सर्व व्हिडिओ वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने बनवले. याशिवाय हॉट शॉट appवर अपलोड केलेल्या २० मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंतचे एकूण ९० व्हिडिओदेखील गुन्हे शाखेने जप्त आहेत.

आज झालेल्या चौकशी दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने उमेश कामत याने यूके स्थित प्रॉडक्शन कंपनी केनरीनला पाठवलेल्या व्हिडिओबाबत राज कुंद्रा याने दुजोरा दिला आहे.

तो स्वत: केनरिनसाठी अश्लील व्हिडीओ अपलोड करत होता की नाही हे शोधण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी राज कुंद्राच्या घरचे सर्व्हर पाठविले आहे.

तथापि, चौकशी दरम्यान राज कुंद्रा सातत्याने असा दावा करीत आहे की, तो अश्लील व्हिडिओ नव्हे तर इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इतर इरॉटिक व्हिडिओंप्रमाणे व्हिडिओ बनवत असे.

सखोल चौकशीदरम्यान राज कुंद्राचा साथीदार आणि आयटी हेड रायन थॉर्पने या संपूर्ण रॅकेटमध्ये कुंद्राची मुख्य भूमिका असल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले. तांत्रिक गोष्टींसह सावधगिरी बाळगून ते कायद्यापासून कसे मुक्त होऊ शकतात हे इतर कर्मचार्‍यांना सांगणे हे रायनचे काम होते.

राज कुंद्रा, वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे.

राज कुंद्रा, वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्ट्रगलिंग मॉडेल्स, अभिनेत्री आणि इतर मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले.

पुढे पोलिसांनी सांगितले की, या अश्लील चित्रपटांच्या शूटिंगसाठी बंगले मुंबईत भाड्याने घेण्यात आले.