Raj kundra : वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राज कुंद्राची आर्थर रोड कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:18 PM2021-07-27T17:18:56+5:302021-07-27T18:56:15+5:30

Raj Kundra : पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आज राज कुंद्राची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

राज कुंद्राला किल्ला कोर्टाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

याच बरोबर राज कुंद्राच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी अर्ज मुंबई हायकोर्टात केला आहे. त्यावर देखील आज सुनावणी झाली. (Photo - TOI)

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राज कुंद्राची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (Photo - TOI)

त्यानंतर जे जे रुग्णालयातून आर्थर रोड तुरुंगात कुंद्राची रवानगी करण्यात आली. (Photo - TOI)

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलैला मुंबई पोलिसांनी अटक केली. याप्रकरणातील ही ११ वी अटक आहे. (Photo - TOI)

फेब्रुवारी महिन्यात बदलला होता फोन - राज कुंद्राने फेब्रुवारी महिन्यात, हे प्रकरण समोर आल्यानंतर आणि आपले नाव या प्रकरणात आल्यानंतर लगेचच आपला फोन बदलला होता, असेही समोर आले आहे.(Photo - TOI)

सांगण्यात येते, की या व्यवसायात राज कुंद्राने मोठा पैसा लावला होता आणि यातून तो मोठा नफाही कमवत होता.