धक्कादायक! पत्नी बाजूला झोपलेली असताना अज्ञाताकडून पतीचा मर्डर, काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 06:35 PM2021-07-07T18:35:54+5:302021-07-07T18:46:38+5:30

Madhya Pradesh Crime News : मृतकाचं लग्न २० जून २०२१ ला झालं होतं आणि त्याची पत्नी ५ जुलैला घरी आली होती. रात्री ६ जुलैला ही घटना घडली. ही घटना घडत असताना पत्नीला काहीच कळालं नाही. ती झोपूनच होती.

मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे ही घटना तेव्हा घडली जेव्हा नवरा-बायको जवळ जवळ झोपले होते. झोपेत असतानाच कुणीतरी पतीची धारदार हत्याराने हत्या केली. तर पत्नी बाजूला झोपेतच होती.

मृत व्यक्तीचं मागच्याच महिन्यात लग्न झालं होतं. पत्नी ५ जुलैला घरी आली होती आणि ६ जुलैला ही घटना घडली. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

१५ दिवसांपूर्वी मलिया खेडी गावात लग्नाचा आनंद आणि जल्लोष अजून संपलाही नव्हता की, या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. मलिया खेडी गावात १५ दिवसांआधीच २० जूनला तरूणाचं लग्न झालं होतं.

एक दिवसाआधीच सून घरी आल्यावर सासू-सासऱ्यासहीत घरातील सगळे लोक होशंगाबादला दर्शनाला गेले होते. अशात घरात केवळ नवीन दाम्पत्य होतं.

पत्नी बाजूलाच झोपलेली होती. पत्नी जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिला पतीचा मृतदेह दिसला आणि याची माहिती तिने लगेच शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांना दिली.

घरात पती-पत्नी दोघे एकटेच होते. २० जूनला दोघांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर दुसऱ्यांदा ती सासरी आली होती आणि त्याच रात्री ही धक्कादायक घटना घडली.

अज्ञात व्यक्तीने महिलेच्या पतीची निर्दयीपणे चेहरा आणि जबडा कापून हत्या केली. गाल आणि जबड्यावर धारदार शस्त्राचे वार आहेत. हत्येनंतर चेहरा इतका विचित्र झाला होता की, बघून अनेकांना भीती वाटली.

मृतकाच्या भावानुसार, नुकतंच दोघांचं लग्न झालं होतं आणि १ दिवसाआधीच सून घरी आली होती. त्याच रात्री ही घटना घडली. त्यांच्या परिवाराचा कुणासोबत वादही नव्हता. आम्ही सगळे आई-बाबांसोबत होशंगाबादला गेलो होतो. घरात केवळ भाऊ आणि त्याची पत्नी होती.

एसडीओपी आरपी रावत म्हणाले की, मलिया खेडी गावात ही घटना घडली. दोघेही पती-पत्नी झोपले होते. नुकतंच जूनमध्ये त्यांचं लग्न झालं होतं. एक दिवसाआधीच मृतकाची पत्नी घरी आली होती. आम्ही चौकशी करत आहोत.

एसडीओपी आरपी रावत म्हणाले की, मलिया खेडी गावात ही घटना घडली. दोघेही पती-पत्नी झोपले होते. नुकतंच जूनमध्ये त्यांचं लग्न झालं होतं. एक दिवसाआधीच मृतकाची पत्नी घरी आली होती. आम्ही चौकशी करत आहोत.