CoWIN च्या नावावर वेगाने पसरतोय मालवेअर, डाऊनलोड केल्यास अकाऊंट होऊ शकतं रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 01:08 PM2021-06-04T13:08:42+5:302021-06-04T13:20:42+5:30

Cyber Crime News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशात लसीकरणाची मोहीमही जोरात सुरू आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी सरकारने CoWIN हे अ‍ॅप लाँच केले आहे. अनेकजण या अ‍ॅपवरून लसीसाठी नोंदणी करत आहेत. दरम्यान, या अ‍ॅपवरही आता स्कॅमर्सची वक्रदृष्टी पडली आहे. स्कॅमर्स CoWIN अ‍ॅपच्या आडून अँड्रॉइड मालवेअर पसरवत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, देशात लसीकरणाची मोहीमही जोरात सुरू आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी सरकारने CoWIN हे अ‍ॅप लाँच केले आहे. अनेकजण या अ‍ॅपवरून लसीसाठी नोंदणी करत आहेत. दरम्यान, या अ‍ॅपवरही आता स्कॅमर्सची वक्रदृष्टी पडली आहे. स्कॅमर्स CoWIN अ‍ॅपच्या आडून अँड्रॉइड मालवेअर पसरवत आहेत.

यासाठी लोकांना एक एसएमएस पाठवला जातो. यामध्ये फ्री कोरोना व्हॅक्सिनेशन स्लॉट बुक करण्यासंबंधी माहिती दिली जाते. तसेच एसएमएससोबत एक लिंक पाठवली जाते. ही लिंक अँड्रॉइड मालवेअरची असते. जेव्हा कुणी व्यक्ती त्यावर क्लिक करते तेव्हा त्यांच्या फोनमध्ये एक मालवेअर इंस्टॉल होतो.

हा मालवेअर युझरच्या फोनमधून कॉन्टॅक्ट, एसएमएससोबत अन्य माहितीसाठीही अ‍ॅक्सेसची मागणी करतो. सायबर सिक्युरिटी फर्म ESET Lukas Stefanko च्या मालवेअर रिसर्चनी सांगितले की, हा मालवेअर यावर्षी एप्रिल महिन्यात पसरणे सुरू झाले. तसेच तो आता सातत्याने अ‍ॅक्टिव्ह आहे.

मालवेअरला Covid-19 vaccine, Covid-19 vaccine registration, Vaccine Register, My-Vaci अशी विविध नावे दिली गेली आहेत. हल्लीच Indian Computer Emergency Response Team (CERT-In) नेसुद्धा फेक CoWIN व्हॅक्सिन रजिस्ट्रेशन अॅप जे एसएमएसच्या माध्यमातून पसरत आहे, त्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

CERT-In ने सांगितले की, एसएमएसमधून जो फेक मेसेस पसरत आहे त्या मेसेजमधून कोविड-१९ लसीच्या नोंदणीचा चुकीचा दावा केला जात आहे. त्यावरून युझर्सला वेगवेगळे मेसेज पाठवले जात आहे. एसएमएस युझरला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगण्यात येत आहे.

हे अ‍ॅप युझरच्या फोनमधून एसएमएसच्या माध्यमातून आपोआप दुसऱ्या कॉन्टॅक्ट्ससोबतही पसरत जातो. हे अॅप युझरची खासगी माहिती घेऊन फायनान्शियल फ्रॉड करू शकतो. त्यामुळे युझर्सनी सावध राहण्याची गरज आहे.

Read in English