बापरे! लग्नानंतर दोन दिवसांनी नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगाला दिले चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:13 PM2021-06-29T22:13:20+5:302021-06-29T22:25:34+5:30

Gangrape Case : लग्नानंतर दोनच दिवसांनी नवविवाहित मुलीला सासरच्या घरात क्रौर्याचे असे प्रकार दिसले की तिला धक्का बसला.

तिच्या सासरच्या घरात तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप नवविवाहित महिलेने केला आहे आणि इतकेच नाही तर आरोपींनी तिच्या गुप्तांगात काठ्या घातल्या. पीडितेने असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. ही लाजीरवाणी घटना उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील आहे.

पीडित मुलीच्या लग्नाला आता फक्त तीन दिवस झाले होते. ज्याच्याबरोबर आयुष्याची सुंदर स्वप्ने आहेत तो इतक्या क्रूरतेने वागेल की हैवानाला सुद्धा लाज वाटली पाहिजे आणि अब्रूचे लुटेरे ज्या घरात जात आहेत त्याच घरात आपण जाऊ असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते.

प्रकरण झरीफनगर पोलिस स्टेशन परिसरातील आहे. पीडितेचे २२ तारखेला जरीफनगरमधील उस्मानपूर येथील रहिवासी असलेल्या युवकाबरोबर लग्न झाले होते. असा आरोप आहे की, जेव्हा मुलगी आपल्या सासरच्या घरी पोहोचली, तेव्हा हुंडा न मिळाल्यामुळे सासरच्यांनी रंगाच्या भारत नवविवाहित मुलीवर अत्याचार करण्याचा कट आखला.

पीडित मुलीने सांगितले की, तिच्यावर 6-7 जणांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करणार्‍यांमध्ये या महिलेचे दोन दीर व तिचा पती यांचा समावेश आहे. तसेच नवऱ्याच्या दोन बहिणी आणि जाऊ यांचा यात सहभाग होता. यासह नवविवाहित नवऱ्याच्या दोन बहिणी आणि जाऊ सुद्धा त्यांना साथ देत होती.

सामूहिक बलात्कारानंतर इतक्यावरच न थांबता नराधमनीं तिच्या गुप्तांगात काठ्या घातल्या, गरम चिमट्याने गुप्तांगाला चटके दिले. कोल्ड्रिंकमध्ये तिला विष देण्याचा प्रयत्न केला होता, असे पीडितेचे म्हणणे आहे.

पीडित मुलीचे वडील म्हणतात की, त्यांच्या मुलीला अतिशय वाईट वागणूक मिळाली आहे. माहिती मिळताच ते पोलिसांकडे पोहोचला आणि आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेले. बदायूंचे एसएसपी संकल्प शर्मा म्हणतात की, नवविवाहित महिलेसोबत हुंड्याच्या मागणीसाठी तिच्या अतिहय निर्दयीपणे छळ केल्याचा तिने तिच्या सासरच्यांवर आरोप केले आहेत. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह महिलेच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. तपासात जे काही सत्य समोर येईल त्या आधारे कारवाई केली जाईल.