Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:18 IST2025-11-23T12:05:44+5:302025-11-23T12:18:30+5:30

Delhi Blast : दिल्ली कार स्फोटाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत.

दिल्ली कार स्फोटाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलच्या इतर सदस्यांमध्ये विचारसरणी, फंड आणि हल्ला करण्याच्या पद्धतीबाबत मतभेद असल्याचे तपासात उघड झाले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, या कारणांमुळे दहशतवादी डॉक्टर उमर नबी ऑक्टोबरमध्ये त्याचा सहकारी आदिलच्या लग्नाला उपस्थित राहिला नव्हता. जेव्हा मौलवी मुफ्ती इरफान वागेला अटक करण्यात आली तेव्हा उमर उर्वरित दहशतवादी गटाशी संबंध सुधारण्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी काश्मीरमधील काझीगुंडला गेला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला दहशतवादी डॉक्टर मुझम्मिल गनई, आदिल आणि मौलवी मुफ्ती इरफान हे उमरशी सहमत नव्हते. हा दहशतवादी गट अल-कायदाच्या विचारसरणीने खूप प्रभावित होता.

दहशतवादी उमर आयसिसने प्रभावित होता आणि त्याला त्याचा आदर्श मानत होता. अल-कायदा पाश्चात्य संस्कृतीवर भर देते आणि दूरच्या शत्रूंवर हल्ला करते, तर आयसिसचे ध्येय जवळचं टार्गेट निवडणं आहे.

मौलवी मुफ्ती वगळता सर्व दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले. म्हणून, त्यांनी त्यांच्याच देशात टार्गेट शोधण्याचा निर्णय घेतला.

दहशतवादी उमर स्वतःला काश्मीरमध्ये बुरहान वाणी आणि झाकीर मुसा यांचा उत्तराधिकारी मानत होता. दिल्लीतील कार स्फोट काझीगुंड बैठकीनंतर तीन आठवड्यांनी झाला. दहशतवादी उमरने तेथील उर्वरित दहशतवाद्यांसोबत समेट घडवल्याचं म्हटलं जातं.

दहशतवादी मुझम्मिल गनईने सांगितलं आहे की, पाच डॉक्टरांनी मिळून अनेक शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी २६ लाख जमवले. तपासात असे दिसून आले की नेटवर्कने स्फोटके आणि रिमोट ट्रिगरिंग उपकरणे मिळविण्यासाठी जवळजवळ दोन वर्षे खर्च केली.

अधिकाऱ्यांच्या मते, गनईने फंडमध्ये ५ लाख दिल्याचं सांगितलं. आदिल राथेर आणि अहमद राथेरने ८ लाख आणि ६ लाख दिले आहेत. दहशतवादी डॉक्टर शाहीन शाहिदीने ५ लाख आणि उमर उन-नबी मोहम्मद २ लाख दिले.