नराधम शिक्षकाला कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा; ५ वीच्या विद्यार्थिनीवर केला होता बलात्कार
By पूनम अपराज | Updated: February 16, 2021 16:43 IST2021-02-16T16:31:57+5:302021-02-16T16:43:11+5:30
Sessions Court judgement on Rape on Minor student : दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. शाळेसारख्या विद्येच्या मंदिरात देखील बलात्काराच्या घडल्याचे अनेकदा समोर आलं आहे. पाटण्यात ५ वीच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला दणका देत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मदत करणाऱ्या लिपिक अभिषेकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पाटण्यात सत्र न्यायालयाने हा महत्वाचा निकाल दिला आहे. तसेच या प्रकरणात कोर्टाने मुख्याध्यापकाला एक लाख रुपये आणि लिपिकाला पन्नास हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे.
सप्टेंबर २०१८ साली, पाटण्यातील फुलवारीशरीफ परिसरातील मित्र मंडळ कॉलनीत असलेल्या न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अरविंद कुमार यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार केला.
धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांना आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचं समजलं. मुलीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिला डॉक्टरकडे उपचारासाठी नेल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचा पुरावा देखील पोलिसांकडे आहे.
त्याचप्रमाणे पीडित मुलीचा आणि मुख्याध्यापच्या डीएनएची तपासणी केली असता ती तपासणी जुळली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर आता पीडित मुलीचे गर्भपात करण्यात आले आहे.