राज कुंद्राच्या 'Mystery Wall'मध्ये सापडलं बॉक्सचं 'घबाड'; उघडकीस आले मोठे खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:38 PM2021-07-25T20:38:11+5:302021-07-25T21:28:37+5:30

Raj Kundra : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची कारवाई सुरुच आहे. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर येऊ लागली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी (२४ जुलै) या प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीम अ‍ॅप कार्यालयावर छापे टाकले होते.

यावेळी पोलिसांनी कार्यालयातील अनेक स्क्रिप्ट जप्त केल्या. पोलिसांना ज्या स्क्रिप्ट मिळाल्या आहेत त्याच्या आधारावर अश्लील चित्रपटांचे चित्रिकरण केलं जाणार होतं, अशीही उघड झाली आहे.

गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राच्या कार्यालयातील मिस्ट्री वॉलमध्ये अनेक बॉक्स ठेवले होते.

गुन्हे शाखेच्या पथकाला त्या बॉक्समध्ये बर्‍याच फाईल्स सापडल्या असून त्या फाईल्सचीही चौकशी केली जात आहे.

मिस्ट्री वॉलमध्ये सापडलेल्या या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकास काही करार हाती लागले आहेत. तसेच काही स्क्रिप्ट देखील सापडल्या आहेत. स्क्रिप्ट हिदीं भाषेमध्ये आहे.

त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर पुन्हा पॉर्न चित्रपट बनवण्याची तयारी केली जात होती. मात्र, राज कुंद्राला अटक केल्यानंतर सर्व स्क्रिप्ट ऑफिसमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे आता गुन्हे शाखेच्या रडारवर राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे जॉईंट बँक अकाउंट देखील आहेत.

या बँक खात्याद्वारे अनेक परदेशातून व्यवहार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.