कोरोनामुळे परिस्थिती बिघडली; पोटासाठी स्वत:च्या मुलांचे लैंगिक शोषण करतायेत आई-वडील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:37 PM2020-06-10T17:37:58+5:302020-06-10T18:03:28+5:30

मनीला : फिलिपिन्स चाइल्ड पॉर्न इंडस्ट्री आणि मुलांचे ऑनलाइन सेक्स रॅकेटसाठी प्रसिद्ध आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे फिलिपिन्समध्ये लॉकडाउन सुरू आहे. मात्र, याचा फायदा पॉर्न इंडस्ट्रीला होत आहे.

या ठिकाणी गरीबी आणि उपासमारीने परिस्थिती इतकी बिकट बनविली आहे की, फक्त 960 रुपयांसाठी पालक आपल्या स्वत: च्या मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहेत.

द सनच्या एका वृत्तानुसार, फिलिपिन्समधून लाईव्ह स्ट्रीमिंग आणि चाइल्ड पार्नची जास्त मागणी ब्रिटनमध्ये आहे. लॉकडाऊनमुळे फिलिपिन्समध्ये बहुतांश व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे पालक स्वत: च्या मुलांचे लैंगिक शोषण करत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी एक असे कुटुंब समोर आले होते की, ज्यामध्ये आई-वडील आपल्या 5 मुलांसोबत लाईव्ह इंटरनेटवर शोषण करीत होते. यामुळे त्यांना दर तासाला सुमारे 1000 रुपये कमाई होत होती.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या कुटुंबातील सर्वात लहान मुलाचे वय फक्त 3 वर्ष होते आणि त्याचे लैंगिक शोषण इंटरनेटवर पाहण्यासाठी संख्याही मोठी होती.

या व्हिडिओची मागणी सर्वाधिक ब्रिटनमध्ये असल्याचे सांगण्यात येते. आता या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी ब्रिटेनच्या नॅशनल क्राइम एजन्सी सक्रिय झाली आहे.

याशिवाय, अमेरिकन एजन्सी एफबीआय आणि युरोपोल देखील या प्रकरणांचा तपास करत आहेत. इंटरनेट वॉच फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, फक्त ब्रिटनमध्ये लॉकडाऊनदरम्यान 9 कोटी लोकांनी अशा प्रकारचे चाइल्ड पॉर्न पाहण्यासाठी सर्च केले आहे.

नॅशनल क्राइम एजन्सीचे प्रमुख जॉन टनागो यांच्या म्हणण्यानुसार, फिलिपिन्समधून इंटरनॅशनल जस्टिस मिशनने गेल्या 5 वर्षांत मोठ्या प्रमाणात तस्करी केलेल्या मुलांना वाचविले आहे.

जॉन टनागो म्हणाले की, फिलिपिन्समध्ये चाइल्ड सेक्स-पॉर्न इंडस्ट्री सर्वात मोठी आहे आणि याठिकाणी लोकांना त्यांच्या पसंतीनुसार व्हिडिओ किंवा लाइव्ह कंटेट सहज उपलब्ध केले जाते.

याचबरोबर, चाइल्ड पॉर्न इंडस्ट्रीचे ग्राहक जास्तकरून पाश्चिमात्य देशातील आहेत. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट केले जाते. तसेच, यासाठी अनेक बनावट पेमेंट वेबसाइट बनविल्या गेल्या आहेत.

Read in English