धक्कादायक! प्रेयसीच्या घरासमोर प्रियकराचा आगीत जळून मृत्यू, विवाहित महिलेच्या कुटुंबियांवर आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:26 PM2021-04-20T12:26:23+5:302021-04-20T12:37:28+5:30

१६ एप्रिल शुक्रवारी रात्री आठ वाजता लोकांनी त्याला महिलेच्या घराबाहेर जळताना पाहिलं होतं. त्यानंतर लोकांनीच पोलिसांना याची माहिती दिली.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे २७ वर्षीय दीपक निषाद नावाच्या तरूणाचा संशयास्पद स्थितीत जळून रविवारी सकाळी ४ वाजता मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलीस अधिकारी अनिल उपाध्याय यांनी सांगितले की, १६ एप्रिलला रात्री एक तरूण महिलेच्या घरासमोर जळाला होता. त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, तरूणाने वडील विशुनपुरवा गावात ठेला चालवतात. ते त्यांची पत्नी आणि पाच मुलांसोबत राहतात. त्यांचा लहान मुलगा दीपक पेंट पॉलिशं काम करत होता आणि तो अविवाहित होता. दीपकचं प्रेम प्रकरण एका विवाहित महिलेसोबत सुरू होतं.

१६ एप्रिल शुक्रवारी रात्री आठ वाजता लोकांनी त्याला महिलेच्या घराबाहेर जळताना पाहिलं होतं. त्यानंतर लोकांनीच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

सोबतच त्याच्या जबाबाचा व्हिडीओही बनवला. ज्यात तो एका महिलेचं नाव घेत आहे आणि आग लावल्याचा आरोप करत आहे. त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

दीपकच्या परिवाराने मुलाच्या प्रेयसीवर आणि तिच्या कुटुंबियांवर मुलाला जाळून मारल्याचा आरोप केला आहे. तर महिलेचे वडील म्हणाले की, तो घरासमोर येऊन शिव्या देत होता. काही वेळाने त्याने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

गावातील लोकांनुसार, दीपक ज्या महिलेवर प्रेम करत होता ती विवाहित आहे. एक वर्षाआधी तिच्या पाचव्या मुलाचा मृतदेह रामगढ येथील तलावात मिळाला होता. मुलाच्या हत्येप्रकरणी तिचा पती तुरूंगात आहे.

या प्रकरणी पोलीस अधिकारी अनिल उपाध्याय यांनी सांगितले की, १६ एप्रिलला रात्री एक तरूण महिलेच्या घरासमोर जळाला होता. त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

तरूण जास्त मद्यसेवन करत होता. याआधीही त्याने दोन-तिनदा स्वत:ला जाळण्याचा प्रयत्न केला होता. प्राथमिक पाहणीतून त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचं दिसतं. तरूणाच्या कुटुंबियांकडून लावण्यात आलेल्या आरोपांनुसार कारवाई केली जाईल.