१० दिवसांआधीच लग्न झालेली नवरी आढळून आली ८ महिन्यांची प्रेग्नेन्ट, नवरदेव 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:18 IST2021-10-01T15:01:51+5:302021-10-01T15:18:36+5:30
तरूणाचं लग्न परिसरातीलच एका तरूणीसोबत लावून देण्यात आलं. लग्नाला दहाच दिवस झाले होते. तर दहाव्या दिवशी तरूणीच्या पोटात दुखू लागलं होतं.

उत्तर प्रदेशच्या बरेली किलाच्या सराय भागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे लग्नानंतर नवी नवरी ८ महिन्यांची गर्भवती आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवरदेवाच्या कुटुंबियांनी याबाबत एसएसपीकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येथील तरूण चपलांच्या दुकानावर काम करतो. परिसरातीलच एका तरूणीसोबत दहा दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं.
तरूणाचं लग्न परिसरातीलच एका तरूणीसोबत लावून देण्यात आलं. लग्नाला दहाच दिवस झाले होते. तर दहाव्या दिवशी तरूणीच्या पोटात दुखू लागलं होतं. तरूणाने डॉक्टरला बोलवलं . त्यानंतर डॉक्टरने जे सांगितलं त्याने सर्वच लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. दहा दिवसांआधी लग्न झालेली नवरी ८ महिन्यांची गर्भवती असल्याची बातमी परिसरात आगीसारखी पसरली. निकाहच्या दहा दिवसांनंतरच नवरी ८ महिन्यांची गर्भवती आढळल्याने सगळेच हैराण झाले.
तर काही लोकांचं असंही मत आहे की, तरूण आणि तरूणीचे आधीच संबंध होते. तर तरूण म्हणाला की, त्याचं तरूणीसोबत अफेअर नव्हतं. तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्यावर दबाव टाकून तिचं लग्न लावून दिलं. जेव्हा तरूणी लग्नानंतर सासरी आली तेव्हा समजलं की, ती ८ महिन्यांची गर्भवती आहे.
यानंतर दोन्ही परिवारात एकच गोंधळ उडाला. आता नवरदेवाकडील लोकांचं म्हणणं आहे की, तरूणीने तिच्या बहिणीच्या दीरासोबत संबंध होते आणि हे बाळही त्याचंच आहे. त्यांनी असाही आरोप लावला की, तरूणीला तिच्या प्रियकरासोबत निकाह करायचं होता. पण तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर दबाव टाकून तिचा निकाह करून दिला.
तरूणीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या जिद्दीत आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे. पण घरातील लोकांना तिच्या या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे तिचं परिसरातीलच तरूणासोबत जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं. तरूण म्हणाला की, आम्ही याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नवरीची मेडिकल टेस्टही केली जाणार आहे. जेणेकरून सत्य समोर येईल.