सारा तेंडुलकरच्या नव्या लूकवर चाहते फिदा; फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:58 PM2022-06-22T17:58:17+5:302022-06-22T18:18:46+5:30

साराने नुकतेच खास फोटोशूट केलं आहे

Sara Tendulkar Beautiful Photoshoot: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची लेक सारा नेहमीच चर्चेत असते. स्टारकीड्स मध्ये तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

सारा तेंडुलकर हळूहळू ग्लॅमर विश्वात आपला ठसा उमटवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत तिचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

साराने मंगळवारी आपल्या एका फोटोशूटच्या 'बिहांईड द सीन्स'चे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.

फोटोशूट करताना काय धमाल झाली, या संबंधीचे काही फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते.

सारा तेंडुलकरने पोस्ट केलेले फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडले. फोटोत साराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केली होती.

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंना चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर हे फोटो इन्स्टास्टोरीवर असूनही चाहत्यांनी स्क्रीनशॉट काढून फोटो व्हायरल केले.