lesbian सीन देण्यासाठी निर्मात्याने केली Urfi Javedवर जबरदस्ती; अभिनेत्रीने घेतला होता आत्महत्येचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 03:32 PM2021-10-25T15:32:13+5:302021-10-25T15:35:59+5:30

Urfi javed: बिग बॉस ओटीटीमुळे विशेष चर्चेत आलेली अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत येत आहे.

बिग बॉस ओटीटीमुळे विशेष चर्चेत आलेली अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत येत आहे.

बोल्ड आऊटफिट परिधान करत असल्यामुळे ऊर्फी बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल होत असते. यात अनेकदा तिचा एअरपोर्ट लूक पाहून नेटकरी तिला ट्रोल करत असतात. परंतु, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या ऊर्फीने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

अलिकडेच ऊर्फीने टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने ट्रोलर्सला उत्तर देण्यासोबतच अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

एका वेब सीरिजच्या चित्रीकरणादरम्यान तिला वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं असं तिने सांगितलं. इतकंच नाही तर बोल्ड सीन देण्यासाठी जबरदस्तीही केल्याचंही ती म्हणाली.

"एका वेब सीरिजच्या चित्रीकरणादरम्यान एका निर्मातीने मला बोल्ड सीन शूट करण्यासाठी जबरदस्ती केली होती. तसंच एक स्त्री असूनही तिने या सीरिजमधील माझ्या फिमेल को-स्टारला माझ्या परवानगीशिवाय माझ्या शरीराला स्पर्ध करण्यास सांगितलं होतं. इतकंच नाही तर संपूर्ण शूट होईपर्यंत मला केवळ अंतर्वस्त्रात राहायला सांगितलं होतं", असं ऊर्फी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "संपूर्ण चित्रीकरणादरम्यान केवळ अंतर्वस्त्रामध्ये वावरणं मला अवघडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मी या गोष्टीचा विरोध केला. तर त्यावर मला कॉन्ट्रॅक्टनुसार,४० लाख रुपयांचा फाइन भरावा लागेल असं सांगण्यात आलं."

"माझ्याकडे त्यावेळी इतके पैसे नसल्यामुळे ते सांगतील तसं सगळं करावं लागलं. या सगळ्या प्रकारामुळे मी नैराश्यात गेले होते. त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या डोक्यात आला होता."

ऊर्फी बिग बॉस ओटीटीमुळे चर्चेत आली. या शो व्यतिरिक्त की 'भैया की दुल्हनिया', 'मेरी दुर्गा', 'बेपनाह', 'पंच बीट सीजन 2' मध्ये झळकली आहे.

Read in English