क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:29 IST2025-04-29T13:26:27+5:302025-04-29T13:29:08+5:30

Credit Card UPI Link : यूपीआयने आर्थिक व्यवहारांची पद्धतच बदलली आहे. आता भाजीची जुडी घ्यायलाही यूपीआयने पेमेंट केले जाते. तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केले तर तुमचा जास्त फायदा आहे.

अलीकडच्या काळात यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वीसारखं रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज पडत नाही. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केले तर त्याचे अनेक फायदे मिळतात. त्याचा योग्य वापर करून, तुम्ही रिवॉर्ड्स आणि अगदी कॅशबॅकसारखे फायदे मिळवू शकता.

यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार करण्याची संस्कृती पूर्णपणे बदलली आहे. यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक केलं तर तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेचा वापर करून ​पेमेंट करू शकता. यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही.

क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते डेबिट कार्डपेक्षा जास्त रिवॉर्ड देते. जर तुम्ही तुमचे RuPay क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केले असेल, तर तुम्हाला प्रत्येक यूपीआय व्यवहारावर रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक देखील मिळू शकेल.

सर्वच ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येत नाही. विशेषतः तुम्ही ते लहान दुकानांमध्ये वापरू शकत नाही. कारण तुम्हाला सर्वत्र POS मशीन मिळणार नाही. पण, जर तुम्ही UPI ला क्रेडिट कार्डशी लिंक केले तर तुम्हाला सर्वत्र QR कोड मिळेल, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे त्वरित पेमेंट करू शकता.

जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले तर ते तुमच्यासाठी बॅकअप पेमेंट पर्याय म्हणून देखील काम करते. जेव्हा तुम्हाला मोठी खरेदी करावी लागते किंवा तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत असता तेव्हा तुम्हाला याचा फायदा होतो.