Digital व्यवहारांमध्ये मोठी वाढ, UPI ट्रान्झॅक्शनमध्ये १०९ टक्क्यांची वाढ; विक्रमी ६.०६ लाख कोटींचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:57 PM2021-09-30T13:57:21+5:302021-09-30T14:08:24+5:30

UPI Payment number Increased : कोरोना महासाथीदरम्यान डिजिटल पेमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कोरोना महासाथीदरम्यान डिजिटल पेमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, जुलैमध्ये UPI द्वारे व्यवहारांचे मूल्य दुप्पटीपेक्षाही अधिक वाढून 6.06 लाख कोटी रुपयांवर पोहोचले झाले.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीमधून ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार, UPI पेमेंटने कार्ड पेमेंटला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. मूल्यानुसार यूपीआयचे व्यवहार या वर्षी जूनमध्ये 5.47 लाख कोटी होते. हा एकप्रकारे एक विक्रमच होता.

जुलै महिन्यात हा आकडा 6 लाख कोटींच्या पुढे गेला. तथापि, कार्डवरील खर्च जुलैमध्ये 1.36 लाख कोटींवर पोहोचला, जो एप्रिलनंतर सर्वाधिक होता. अर्थव्यवस्थेला कोरोना संकटातून बाहेर येण्याचे संकेत म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनलावण्यात आला होता. परंतु लॉकडाऊन उठवल्यानंतर यूपीआय प्लॅटफॉर्मवर 109 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ग्राहकांनी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू तसेच स्थानिक दुकानांमध्ये काही मोठ्या खरेदीसाठी UPI चा वापर करण्यात आलाय

दरम्यान, हे अधिक सुरक्षित असल्याने लोकही त्याचा अवलंब करत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, त्यांना स्वतंत्र पेमेंट अॅप्स असण्याची गरज नाही.

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात कार्ड व्यवहारात 42 टक्के वाढ झाली आहे. यूपीआयद्वारे पेमेंटच्या वाढीच्या दरापेक्षा हे खूप कमी आहे.

तथापि, तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार यूपीआय सारख्या अॅप्सच्या व्यवहारात जोरदार वाढ होऊनही कार्ड व्यवहारांमध्ये सरासरी 40 टक्के वाढ स्तुत्य आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार कार्डच्या माध्यमातून मोठ्या रकमेचा भारणा करण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. याशिवाय यूपीआयद्वारे बिल भरणं किंवा अन्य खरेदीसारख्या गोष्टी केल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.