याला म्हणतात शेअर! नाश्ता ते लंच, कमावले 205 अब्ज डॉलर; या आहेत एका दिवसात सर्वाधिक कमावणाऱ्या कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 01:39 PM2024-02-04T13:39:30+5:302024-02-04T13:43:08+5:30

आज आम्ही आपल्याला काही अशा कंपन्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांच्या मार्केट कॅपमध्ये एका दिवसांत झालीय बंपर वाढ...

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी मेटा प्लॅटफॉर्मने या आठवड्यात एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. शुक्रवारी, या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 20% पेक्षा अधिक वाढ झाली आणि एका झटक्यात तिचे मार्केट कॅप 205 अब्ज डॉलरने वाढले. एका दिवसात कोणत्याही कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये झालेली ही सर्वात मोठी उसळी आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे, एका दिवसात मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक घसरणीचा विक्रमही मार्क झुकरबर्ग यांच्या याच कंपनीच्या नावे आहे. आज आम्ही आपल्याला काही अशा कंपन्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांच्या मार्केट कॅपमध्ये एका दिवसांत झालीय बंपर वाढ...

​मेटा - या यादीत फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेली मेटा प्लेटफॉर्म्स पहिल्या क्रमांकावर आहे. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 205.3 अब्ज डॉलरने वाढले. या कंपनीत मार्क झुकरबर्गचा वाटा 13% एवढा आहे. मेटाने नुकताच आपला रिझल्ट जारी केला आहे. कंपनीचा निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षाही अत्यंत चांगला आहे. यामुळेच कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी दिसून येत आहे.

अॅपल - मेटापूर्वी एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम ॲपलच्या नावे होता. 10 नोव्हेंबर 2022 रोजी या आयफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 190.9 बिलियन डॉलरची वाढ झाली होती. एवडेच नाही तर, या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये तीन वेळा 150 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत ॲपल मायक्रोसॉफ्टनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अॅमेझॉन - अमेरिकेतील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी Amazon चे मार्केट कॅप ४ फेब्रुवारी २०२२ रोजी १९०.८ अब्ज डॉलरने वाढले. जेफ बेझोस यांची ही कंपनी सध्या 1.775 ट्रिलियन डॉलरच्या मार्केट कॅपसह जगातील चौथी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. केवळ मायक्रोसॉफ्ट, ऍपल आणि सौदी अरामकोच हिच्या पुढे आहे. हिची सुरुवात एका गॅरेजपासून झाली आणि आज ती जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे.

एनव्हिडिया - AI चिप तयार करणारी कंपनी एनव्हिडियाने गेल्या वर्षी 25 मे रोजी मोठी झेप घेतली होती. त्या दिवशी कंपनीचे मार्केट कॅप 184.1 अब्ज डॉलरने वाढले. या अमेरिकन कंपनीची स्थापना तैवानमध्ये जन्मलेल्या जेन्सेन हुआंग यांनी केली होती. आज ही कंपनी 1.634 ट्रिलियन डॉलरसह जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. जगभरात एआय संदर्भातील चिप्सची मागणी वाढल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

​मायक्रोसॉफ्ट - जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप १३ मार्च २०२० रोजी १५०.४ अब्ज डॉलरने वाढले होते. तर गेल्या वर्षी 26 एप्रिल रोजीही कंपनीचे मार्केट कॅप 148.3 अब्ज डॉलरने वाढले होते. मायक्रोसॉफ्ट ही 3.055 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप सह जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. हिची स्थापना बिल गेट्स यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह केली होती.

टेस्ला - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची कंपनी टेस्ला या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे मार्केट कॅप 143.6 अब्ज डॉलरने वाढले होते. टेस्ला इलेक्ट्रिक कार तयार करते आणि जगातील सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी आहे. 598.45 अब्ज डॉलर मार्केट कॅपसह, ही कंपनी जगातील 11 व्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षात आतापर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 200 अब्ज डॉलरने घसरले आहे.

(टीप - येथे केवळ कंपन्यांच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)