'या' बँका RD वर जास्त व्याज देतात, वाचा एका क्लिकवर यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 03:35 PM2023-09-24T15:35:48+5:302023-09-24T15:40:42+5:30

आपण पैशाची बचत करण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करतो.

आपण पैशाची बचत करण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करतो. यात एफडी, आरडी या सारख्या योजना असतात.

सध्याच्या दिवसात अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, पण जही बरेच जण बँकेच्या आरडी आणि एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी रिकरिंग डिपॉझिट हा चांगला पर्याय आहे. यामध्ये दररोज एक छोटी रक्कम गुंतवून तुम्ही मोठी रक्कम तयार करू शकता. बँका सहसा ६ महिने ते १२० महिन्यांपर्यंतच्या ग्राहकांना आरडी योजना देतात.

ICICI बँक ६ महिने ते १२० महिन्यांपर्यंतच्या RD योजनांवर सर्वसामान्य ग्राहकांना ४.७५ टक्के ते ६.९० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.२५ टक्के ते ७.५० टक्के व्याजदर देत आहे.

HDFC बँक सामान्य ग्राहकांना RD वर ४.५० टक्के ते ७.०० टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.०० टक्के ते ७.७५ टक्के व्याजदर देत आहे.

स्टेट बँक सामान्य ग्राहकांना RD योजनेवर ३.०० टक्के ते ७.०० टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.८२ टक्के व्याजदर दिले जात आहे.

Axis Bank RD योजनेवर ३.००% ते ७.००% पर्यंत व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.७५ टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.

बँक ऑफ बडोदा सामान्य ग्राहकांसाठी ३.०० टक्के ते ८.०० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.७५ टक्के ते ७.२५ टक्के व्याजदर मिळवत आहे.