'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:34 IST2025-05-06T17:25:59+5:302025-05-06T17:34:50+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तान आणि भारतातील अनेक गोष्टींची तुलना केली जात आहे. मग त्यात लष्कर, अर्थव्यवस्था आणि इतर मुद्दे येताहेत. पण, पाकिस्तानातील श्रीमंत शहरांबद्दल तुम्हाला माहितीये का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. भारतानचे पाणीच तोडले आहे. पाकिस्तानसोबतचा व्यापारही बंद केला आहे. त्यामुळे पाकिस्तानाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही चर्चा सुरू झाल्या आहेत.

तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन समजली जाणारी काही शहरं आहेत. तशीच ती पाकिस्तानातही आहेत. पण, त्यांची तुलना आर्थिकदृष्ट्या मुंबई-दिल्लीशी केली, तर तुम्हालाही आकडेवारी वाचून आश्चर्य वाटेल.

पहिलं शहर आहे कराची. पाकिस्तानातील सर्वात मोठं आणि श्रीमंत शहर. पाकिस्तानच्या जीडीपीमध्ये या शहराचे ७५ बिलियन डॉलर इतकं योगदान आहे. देशातील आर्थिक आणि वित्त केंद्र असलेल्या कराचीत मोठे बंदरही आहे.

त्यानंतर येतं लाहोर! पाकिस्तानातील श्रीमंत शहरांपैकी हे एक आहे. देशाच्या जीडीपीमध्ये ४० बिलियन डॉलर इतकं योगदान या शहराचे आहे. कापड, स्टील, औषधी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी हे ओळखलं जातं.

फैसलाबादला पाकिस्तानचं मॅन्चेस्टर म्हटलं जातं. देशाच्या जीडीपीमध्ये या शहराचा वाटा २१ बिलियन डॉलर इतका आहे. तर सियालकोट शहराचा वाटा १३ बिलियन डॉलर इतका आहे. मुल्लानबद्दलही तुम्ही ऐकलं असेल, तर मुल्लानचा देशाच्या जीडीपीतील वाटा आहे १२ बिलियन डॉलर.

पाकिस्तानातील या शहरांची भारतातील दिल्ली-मुंबईशी तुलना करायची झाली, तर ती शहरं खूपच लहान ठरतात. म्हणजे एखादे छोटे शहर वाटावे असे. देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा किती आहे, तर तो आहे ३१० बिलियन डॉलर इतका. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा वाटा आणि कराचीचा वाटा यात मोठी तफावत आहे.