Post Office च्या 'या' ६ स्कीम्स करवतील मालामाल, रिटर्न्स पाहून स्वत:च थोपटवून घ्याल तुमची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:26 IST2025-01-11T09:16:53+5:302025-01-11T09:26:18+5:30

Post Office Schemes with High Returns: जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल जिथे तुम्हाला भरपूर व्याज मिळेल आणि गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची ही हमी मिळेल, तर त्याचे पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतील.

Post Office Schemes with High Returns: जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल जिथे तुम्हाला भरपूर व्याज मिळेल आणि गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची ही हमी मिळेल, तर त्याचे पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतील. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही शॉर्ट टर्मपासून लाँग टर्मपर्यंत सर्व योजना चालवल्या जातात. इकडे अशा सहा योजना आहेत ज्या तुम्हाला मालामाल करू शकतात. यामध्ये ७.५% ते ८.२% पर्यंत व्याज दिलं जात आहे.

पोस्ट ऑफिस एफडी - पोस्ट ऑफिसमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षांच्या एफडी चालवल्या जातात. जर तुम्ही ५ वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला ७.५% दरानं व्याज मिळेल. तसंच या एफडीवर टॅक्स बेनिफिटही मिळणार आहे.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट - जर महिलांना आपले पैसे गुंतवायचे असतील आणि त्यावर चांगल्या व्याजदराचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना चालवली जाते. यात दोन वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. या रकमेवर सरकार ७.५ टक्के दरानं व्याजही देत आहे. या योजनेत ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणुकीची संधी आहे.

एनएससी - पोस्ट ऑफिसमध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट नावाची स्कीम आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी रक्कम गुंतवली जाते. सध्या या योजनेवर ७.७ टक्के दरानं व्याज मिळत आहे.

सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम - ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर जास्त व्याजाचा लाभ मिळावा यासाठी सरकार पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना राबवते. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूकही केली जाते. या योजनेवर ८.२ टक्के दराने व्याज मिळत आहे.

सुकन्या समृद्धी - मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना चालवली जाते. बँक आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा पर्याय मिळेल. यात १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि ही योजना २१ वर्षांनी मॅच्युअर होते. यामध्ये वार्षिक २५० रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. सध्या या योजनेवर ८.२ टक्के दरानं व्याजही मिळत आहे.

किसान विकास पत्र - जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी रक्कम गुंतवू शकत असाल तर किसान विकास पत्र हादेखील एक चांगला पर्याय आहे. ही योजना ११५ महिन्यांत तुमची रक्कम दुप्पट करते. या योजनेवर ७.५ टक्के दरानं व्याजही दिलं जात आहे.