भारतात स्मार्टफोनचे मार्केट बदलणार! अमेरिका अन् चीनचे टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 19:14 IST2025-01-04T19:06:20+5:302025-01-04T19:14:24+5:30
भारतात आता स्मार्ट फोनचे मार्केट बदलणार आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंट टेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार, भारतातील ग्राहक आता प्रीमियम स्मार्टफोनकडे वळत आहेत.

सध्या चीन आणि अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आता भारतालाही मोठी बाजारपेठ मिळत आहे. Apple आणि Samsung यांच्या प्रीमियम स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे, भारतीय स्मार्टफोन बाजाराचा आवाका वाढत आहे.
२०२५ पर्यंत ५० डॉलर अब्ज (अंदाजे ४,२८,९०० कोटी रुपये) पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर भारत सर्वत मोठ् मार्केटमध्ये चीन आणि अमेरिकेच्या जवळ येईल, एका अहवालामधून ही माहिती समोर आली आहे.
मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंट टेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार, आता भारतातील ग्राहक प्रिमियम स्मार्टफोनकडे वळला आहे. यामुळे एकूण बाजारपेठेत या विभागाचा वाटा वाढत आहे.
अहवालानुसार, भारताचा स्मार्टफोन बाजार २०२५ मध्ये ५० अब्ज डॉलर पार करून सर्वोच्च पातळी गाठण्याच्या मार्गावर आहे. अॅपल आणि सॅमसंग सारखे ब्रँड प्रीमियम आणि अल्ट्रा-प्रिमियम विभागांमध्ये स्पर्धात्मक उत्पादने देत आहेत. यामुळे मार्केटमध्ये बदल होत आहे. प्रीमियम फोन्सकडे वाढत्या कलामुळे, भारतीय स्मार्टफोन बाजाराची सरासरी किरकोळ विक्री किंमत या वर्षी पहिल्यांदाच ३०० डॉलर (अंदाजे २५,७०० रुपये) च्या वर जाऊ शकते.
२००१ मध्ये भारतीय स्मार्टफोनचे मार्केट ३९.९ अरब डॉलर होते. २०२३-२४ मध्ये अॅपलने भारतात भारतातील मोबाईल फोन व्यवसायातून एकूण ६७,१२१.६ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर सॅमसंगने ७१,१५७.६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
अहवालानुसार, स्थानिक उत्पादन आणि आयफोन उत्पादनांच्या काही दिवसापूर्वी झालेल्या किंमतीतील कपातीमुळे, Apple ला त्यांच्या 'प्रो-सिरीज'साठी जोरदार मागणी अपेक्षित आहे. दरम्यान, आता सॅमसंगच्या प्राइज सेंट्रींक धोरणाला गती मिळत आहे.
Vivo, Oppo आणि OnePlus यासारख्या चायनीज कंपन्या ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत जास्त फिचर देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
OnePlus मध्ये काही तांत्रिक समस्या जाणवत होत्या. यावर आता कंपनीने काम केले आहे. यामुळे या समस्या सुटल्या आहेत. २०२५ पर्यंत प्रीमियम सेगमेंटचा (किंमत ३०,००० रुपयांपेक्षा जास्त) स्मार्टफोन मार्केटमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाटा असेल, असं अहवालात म्हटले आहे.